Monday 19 December 2011

कुछ लम्हे.......................


कुछ  लम्हे हैं  उनके 
मेरे पलन्कोकी  छाव   मे 
जब्  भी करती हु  मे  बन्द उन्हे 
उतर  आते हैं  वोह् बनके नज़्मे
कुछ  लम्हे हैं  उनके 
मेरे पलन्कोकी  छाव   मे  ।
कभी युहि हसाते  हैं
कभी गुमसुम कर जाते हैं
कभी  कुछ  केहते  हैं मुजसे 
कभी  कुछ  केह्लवाते हैं
कुछ  लम्हे हैं  उनके 
मेरे पलन्कोकी  छाव   मे II
कभी बारिश मै भिग जाते हैं
कभी साया सा बन जाते है
कभी अल्लड से बेहक  जाते हैं 
कभी बेहकनेसे  टोकते हैं
कुछ  लम्हे हैं  उनके 
मेरे पलन्कोकी  छाव   मे  ।
उन्हे तो  पाया नही हमने 
पर इस लम्होसे जिते हैं
जीये कैसे ज़िन्दगि हसकर
अब इन्ही  लम्हो  से सिख्ते हैं 
कुछ  लम्हे हैं  उनके 
मेरे पलन्कोकी  छाव   मे  ।

अस्मी 
२०.१२.२०११

Sunday 18 December 2011

मैत्री ....कशी असते मैत्री ...कुठे भेटते मैत्री ...कोणाची असते मैत्री ...मैत्री या शब्दात स्निग्धता आहे असहि वाटत मला ..मग कधी हीच मैत्री ..इतकी अबोल होऊन जाते ..रुसून जाते .......
मैत्री हक्काचं अस एक दार आहे जे तुम्ही कधीही ..हक्काने ठोठावू शकता ...मग ते दार अचानक बंद का होत ....आपण चुकतो कि   आपण निवडलेली मैत्रीच चुकते ...आपण  मनातल उघड करायचं आणि समोरच्याने मात्र मिटत जायचं ..स्वताभोवातीच कोश करून आपल्याला वेगळ करायचं ...अशी असते का मैत्री ...? कशी असते मैत्री ? तुम्हीच सांगा ........

Thursday 15 December 2011

गुंतता हृदय हे.............

 
 
 
 
 
 
 
गुंतता हृदय हे ....अस आणि अस कितीतरी आपण आपल्या मनाचे धागे बांधत असतो ...कित्येक व्यक्ती रोजच्या आयुष्य पटलावर  येत असतात , जात असतात ..काही मनाच्या तळ्याशी थांबतात ..वाटसरू होतात ..काही घडीचे डाव मांडतात ...काही आपली तहान भागवतात आणि आपल्यालाच कोरड ठेवून निघून जातात ..काही चिवचीवतात  तर काही धुंद सुरांनी भारावून टाकतात ...काही आपल्यात स्वताचे प्रतिबिंब पाहतात आणि काही आपल्याला त्यांच्यातच आपल प्रतिबिंब पाहण्याची मोहिनी घालतात ..हे मन कधी  गुंतत ..कधी हरवत ..कधी बेभान होत ..कधी मोहाच्या चार क्षणांना भुलत ..कधी खोल गर्तेत जात ..तर कधी लहान मुलाच्या अल्लडपनालाही मागे टाकत ,इतक उथळ आणि अवखळ होऊन जात ...मन गुंततच जात .....गीतकार गुरु ठाकूरचे " मन उधान वाऱ्याचे"  ऐकताना मनाच्या साऱ्या छटा अशा सामोरी येतात आणि मग मन पुन्हा पुन्हा त्या शब्दात गुंतून राहत ....
आयुष्यात येणारी नाती हि अशीच काही ..काही रक्ताची म्हणून हक्काने येणारी आणि काही मन गुन्तलय  म्हणून सोबत करणारी ..काही विधात्याने ठरवलेली तर काही अनपेक्षित पणे समोर आलेली ...काही चौकटीत हट्टाने बसणारी ..काही आपण हट्टाने बसवलेली आणि काही चौकटीपलीकडची  ..हवी हवीशी ...
कधी कधी मन हे खुळ्यागत वागत ...नसलेल्या गोष्टीच त्याला हव्याश्या असतात ...चौकटीच्या पलीकडच्या नात्यातच ते कधी कधी पार रमून जात इतक कि वास्तवाचं त्याला भानच राहत नाही ..किती सारे रंग ..आठवणी ...क्षण हे मन या नात्यात गुंतवत आणि मग एका क्षणी केवळ हे नात समाजमान्य नाही म्हणून मागे फिरत ..त्या नात्याचा तळ न ओलांडताच ..सारे बंध ..सारा आवेग  मागे ठेवून ..
पण मग हे नात तकलादू असत ? यात खऱ्या भावना नसतात का ? जे प्रेम ..जे क्षण उधळले ते सार आभासी , खोट, फसव  असत का ? समाजमान्य नात तितक खर आणि हे मात्र खोट अस होऊ शकत का ? नाही होऊ शकत.. हेही नातच तितकच उत्कट असत जितक निर्मळ मनाची साद ...पण या नात्याला शेवट नाहीय आणि असलाच तर तो सुखद असेलच अस नाहीय ....
तरीही हृदय गुंतत ...पुन्हा पुन्हा गुंतत ....
 
अस्मी

Wednesday 16 November 2011



आठवणींचा गुंता ..............


आज बोलता बोलता माजा एक मित्र सहज बोलून गेला " आठवणीना जपण्यापेक्षा माणसाना जप  ,ते जास्त सहज आणि सोप्प आहे .."
खरतर या वाक्यात किती तथ्य आहे ..म्हणजे प्रत्येकाच्या मनाला एक कप्पा असतो ..स्वताचा कप्पा ...त्या कप्प्यात न जाणो किती आठवणी जपल्या जातात ..असंख्य , अगणित ,रंगाच्या - बिनरंगाच्या, चांगल्या - वाईट ..चित्र - विचित्र ...खोल खोल आठवणींचा कप्पा ...आणि या कप्प्यात अनेक कप्पे..काही चोरकप्पे ..काही अगदी उरी जपलेले तळकप्पे ..बापरे ! हा गुंता - हे विवर किती तरी खोल आहे ..कांद्याच्या पान्तीसारखा..पातीत पाती - तश्या आठवणीत - आठवणी ..गुंतागुंत ..एक आठवण दुसर्या आठवणीला जोडलेली ..कधी चांगल्या सुरवातीपासून vaitakade जाणारी .. तर कधी वाईट तून चांगल्यात  बदलणारी ...
जन्माला येण्याआधी आणि आल्यावरही " आठवणी " हा शब्द  जोडला जातो ...आणि मग सुरु होतो या आठवणींचा खेळ ..पण गम्मत म्हणजे वयाच्या प्रत्येक टप्प्यात याचं स्वरूप मात्र बदलत जात ..labels  लागत जातात ..एकेका कप्प्यात त्या sort  होत जातात ....कधी बालपणीच्या सुखद आठवणी ..शाळेतल्या गमती जमतींच्या आठवणी .सुट्टीतल्या  आजोळच्या गोड आठवणी ...कॉलेज च्या  पहिल्या प्रेमाच्या आठवणी ...तुटलेल्या रुद्याच्या आठवणी ..पहिली नोकरी .. ...बरंच काही ..सार काही पहिलं म्हणून जपलेल ..खोलवर कुठेतरी दडवून ठेवलेलं ..आणि मग त्यावर असंख्य जोडआठवणी  जोडलेल्या ..आठवणी आणि मन याचं एकमेकांशी असलेल नात तरल आहे ..एकमेकांशिवाय ते अपूर्ण आहेत ..तसच आठवणी आणि स्वप्नांचं....
रोजच्या वागण्या बोलण्यात ...वावरण्यात किती तरी चेहरे नजरेसमोरून जात असतात ..आपले डोळे मन ते चेहरे टिपत असतात आणि मग काही चेहरे - आवाज आपल्या आठवणींचा भाग होऊन तो मनाच्या कप्प्यात साठवला जातो जस computerchya memory मध्ये  data save होतो ..पुन्हा गुंतागुंतीची प्रक्रिया ..काय काय जपत हे मन ..पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत ..बर हे तिथेच संपत नाही तर एका श्वासापासून ते आपोआप  कळत    नकळत दुसर्या मनापर्यंत पोहचवत आठवणीना ...शेवटच्या श्वासात रिकामे केलेले हे कप्पे  नकळतपने  इतरांच्या मनाच्या कप्प्यात विखुरतात ..विसावतात..अस्तित्व ठळक करून जातात ..
" आठवणी यांची नेमकी वाख्याच मांडता येणार नाही ..आठवण ..आठव ..यांदे .. सार अनाकलनीय ..हा प्रवास ..मेंदूपासून .मनापर्यन्त्चा ...पण कधी कधी हा भार  सोसवेनासा  होतो मनाला ..मग त्या सार्या नको असणार्या  आठवणीना खेचून बाहेर काडावस वाटत ..त्यांच्यासाठी मनाचे दरवाजे कायम बंद करून घ्यावेसे वाटत ..छळतात  आठवणी मनाला ..रडवतात डोळ्यांना ..रात्र रात्र जागवतात आठवणी ..काय चुकल? कुठे? कोणाच .. याचा पिंगा घालून मेंदूचा पार भुगा करून टाकतात आठवणी ..डोळ्यांच्या ओल्या कडा आणि मनाला कड देतात या आठवणी ..तेव्हा वाटत थांबवा कोणीतरी हा खेळ ..कोर होवू दे मन ..नकोच या जीवघेण्या आठवणी ...पण येते का पुसता मनाची पाटी ...कोर करता येत का मनाला ..मग पटत कि एवड्या सार्या आठवणी जपण्यापेक्षा त्या व्यक्तीला जपा ..कडू झालेल्या  मनाला निदान  त्याच्या आठवणी सतत छळणार तर नाहीत ..काळाच्या ओघात ती व्यक्तीच तेवडी समोर राहील ..जीवघेण्या आठवणी नाहीत ...
पण राहू शकतो आपण आठवाशिवाय ...?...माणसाचं काय किंवा नात्याच  काय ती आज आहेत ,उद्या नाहीत ..कोणालाही जीवापाड जपल तरी शाश्वत असा काहीच नाही ..हि नाती दगा देणार नाहीत ..सोडून जाणार नाहीत हे कशावरून ...त्यापेक्षा या मुक्या आठवणी बऱ्या ..सदेव सोबत असतात या ..सुखात - दुखात  ..साथ करतात या ..एकटेपणात  भरभक्कम आधार असतात या ..
एक गंमतीने पाहिलं तर या fast life  मध्ये या अशा असंख्य आठवणी कशा जपता येतील ..मनाला - मेंदूला इतका भार  देवून कस चालेल ..आणि यात वेळ घालवायला इतका वेळ आहेच कोणाकडे ? आज हाताशी असंख्य साधने आहेत संपर्काची ..कुणाचीही अगदी कधीही ..कुठल्याही प्रहरी आठवण आली कि phone  , net  आहेच कि हाताशी ..मग आठवणी जपा आणि झुरा कशासाठी ... मग " दूर देशी आहेस तू ..
आठवण तुजी मजकडे..डोळे आतुरले पाहायला..मन धावे तुज्याकडे..." आताच्या fast life मध्ये हि वेडी साद घालायला इतका वेळ आहे कोणाकडे  ..सातासमुद्रापार असणारी व्यक्तीही स्क्रीन वर दिसते कि आपल्याला हवी तेव्हा ..२४ तास connected people  आहोत कि आपण  ..मग काय ..मनाचे कप्पे संकुचित होतायत आत्ता ...लिमिटेड space  आणि time  आहे मनाकडे .....मग एक माणूस आणि nos.. of  आठवणी यापेक्षा त्या माणसालाच connected  ठेवा ..मग आठवणी जपण्याचा प्रश्नच येत नाही ...but this think apart ......
 आठवणी या हव्यातच ..भूतकाळात वावरायला..साथ द्यायला..हुरहुरत्या सांजेला डोळ्यांच्या कड ओलसर करायला..चंद्राची चाकोरीसारखी वाट पाह्यला.. नकळत ओंठावर आणि मनावर छानस हास्य फुलवायला..शिकताना  आणि खूप सारे शिकवून देण्यासाठी आठवणी या हव्यातच ...
आठवणी म्हणजे भूतकाळातून वर्तमानाला जोडून त्यावर भविष्य उभारणाऱ्या पुलासारखा ...आणि वर्तमानातून जर्कन भूतकाळात घेवून जाणार्या
वादळ्यासारख्या ...आठवणी  या हव्यातच ...
आणि त्याचं  काय त्या सोबत असतातच..अगदी टाळायच्या म्हटलं तरी नाही येत टाळता ..उलट जितक दूर धावाल तितक्या त्या तुम्हाला अधिक बिलगतात..या आठवांचा मोह..ध्यास अनाकलनीय आहे ..कधी या आठवणी पाठशिवणीचा खेळ खेळतात तर कधी स्वप्नांचे भय दाखवतात आणि मग त्यातूनच गुरू ठाकूरच्या लेखणीतून उतरलेलं " एक भिगा लम्हा न जाणे  कैसे छूट गया यादोन्के  के बंद कमरेसे .." यासारख तरल काव्य उमटत ..त्याच्या कोंकणातल्या कित्येक आठवणींनी कोंकण विदर्भात  बहरल ..आणि मग हाच कवी " आठवणींचा बसलो होतो पिंजत कापूस ..तशात पाऊस ..." अस म्हणून उगा हळव करून टाकतो ... 
कवी सौमित्रच्या " क्षण एकही न ज्याला तुजी आठवण नाही ... याने जो गहिवरला नाही तो विरळा ...
अशा या आठवनिच्या  सावल्या ..अंधार असो व लक्ख उजेड सतत सोबत राहतात..  रुंजी घालत ...
आणि आयुष्य समर्थपणे जगायला ..हुंदडायला ..साथ सोबत करायला आणि भूतकाळाच्या पाऊल वाटेवर  उमटलेल्या पाऊलखुणा पुन्हा पुन्हा वळून पाहताना ..आठवणी या हव्याच ...
नात्याच्या मोहात नाती जपताना या आठवणी हि जपा ..यांचा ठेवा अनमोल आहे ..नात्यात अंतर येत  पण  आठवांत नाही ..नाती दुरावतात ..आठवणी बिलगतात ..या आपल्या आहेत ..हक्काच्या ....हक्काने ..आठवणीने जपा  या आठवणी ....

अस्मी 
१६.११.११

Thursday 13 October 2011



एक वोह लम्हा था अंजानासा 
न जाने कहा खो गया ,
जिसमे कभी आप हमारे थे ,
वोह मोड न जाने कहा गया...
हम आज भी खोये है,
वही  चांद सितारो में,
सुलगती आहो  में,
आपके खयालो में,
वोह बेकरार समा,
न जाने  गुमसुम रह गया..........
अब पत्तोंसे उड रहे है राहो  में,
न ठिकाना  इस दिल का कोई रहा,
मुकाम अब पाने कि चाह नही ,
इस रूह मै  कोई आस नही,
एक तरसता किनारा था कभी 
न जाने कैसे बूज गया  .....
अस्मी 
१४.१०.११


Wednesday 7 September 2011

तू जवळ असतोस तेव्हा भांडावस वाटत
तू दूर गेलास कि आठवावस वाटत
तू जवळ असताना उगा डोळे घट्ट मिटतात
अन तू दूर असताना तुज्यासाठी जागतात..........
तू दूर असताना उगा मन बावरत
अन जवळ असताना उगा शहारत
तू दूर असतोस तेव्हा डोळे पाणावतात
अन जवळ असताना न बोलता बोलतात .....
अस्मी

Friday 2 September 2011

PAVSALA ATHAVNINCHA .....

पहाटे पहाटे जाग आली तीच मुळी पावसाच्या धुवांधार कोसळण्याच्या आवाजाने , उठून खिडकीत उभी राहिले , बाहेर मिट्ट काळोख पडला होता , पक्ष्यांची चिवचिव न्हवती ,रस्त्यावर चीट पाखरू हि दिसत न्हवत , नेहमीचा पहाटे ४ वाजता गजबजणारा रस्ता सुना पडला होता , कुठलीच हालचाल न्हवती , उजाडण्याची लक्षणे न्हवती , मी खुळ्यागत हे सार पहात होते , भान हरवल्यासारखे अंधारात काही शोधत होते ...मन झर झर मागे जात होते ..किती पावसाळे पहिले मनाशीच मेळ घालत होते ....अन मग हसूच आल एकदम , काय हे वेड्यासारखे ...पण मग वाटल जाव कि पुन्हा एकदा त्या सगळ्या पावसाळ्यात ...पहाव पुन्हा एकदा शहारून ....प्रत्येक पावसाला जाग करून .....
अजूनही आठवतो मला माजा शाळेतला पावसाळा ...नवा वर्ग, नवे दप्तर , नवा कोरा युनिफोर्म , नवे मित्र - मैत्रिणी , आणि नवा पावसाळा , नव्या कोर्या पुस्तकांच्या गंधात ह्या पावसाळ्याचा गंध जणू मिसळलेला ..किती काळजीने आईने रिक्षात बसवलं होत , दाटीवाटीने ओल्या रेनकोट ने एकमेकांना ढोसत आम्ही शाळेत निघालो होतो , काय मज्जा होती नाही ..त्यातही मला पहायचं होत रस्त्यात साचलेल्या पाण्यातून रिक्षा गेल्यावर उडणारे पाण्याचे फवारे ...आणि मग रिक्श्वल्या काकांचा ओरडा ..अरे नीट बसा रे ..कशाला वाकून pahtaay , नेहमीच येतो हा पावसाळा ..तरीही उतुस्क्ता पावसाची ..........
घरी आल्यावर आईने पुसलेले केस आणि गरम गरम हळदीच दुध ..त्या गाल्लेरीतल्या तळहातावर झेललेया सरी..इवलीशी छत्री घेऊन आईच्या पाठी पाठी चालणारी मी ..सारे एकत्र येऊन बिल्डींगच्या खाली साचलेल्या पाण्यात सोडलेल्या होड्या . आणि तुजी -कि माजी ची अहमिका... सार आठवत ..अगदी पावसात भिजल्यामुळे आईचा खालेल्ला धपाटाहि .....
आणि त्या नंतर आला पावसाळा तोच मुळी गुलाबी शहारा घेऊन , कॉलेज मधला पहिला पावसाळा म्हणून जरा अमळ कौतुकच , नवे कॉलेज , नवा साज , थोडी भीती आणि खूप सार tention , पहिल्यांदाच केलेला एकटीने ट्रेनचा प्रवास , आणि सोबतीला पाऊस ..माजा पाऊस ..आणि मग जशी मी कॉलेज मध्ये रमत गेले तसा हा ५ वर्षांचा पावसाळा अधिकच गहिरा होत गेला ..किती सार्या आठवणी मनाच्या कप्प्यात दडवून ठेवल्या ..चिंब चिंब ...पहिला क्रश , त्याने भर पावसात दिलेली घरापर्यन्त्ची लिफ्ट, वाटेत थांबून घेतलेली गरम गरम कॉफ्फी, त्याचा गंध आजही मनात आहे ...त्या दिवसात किती मोगर्याची रोपे लावली असतील मी , किती कविता केल्या असतील , उगाच कितीदा त्याची वाट पाहत बस stop वर पावसात भिजले असेन मी ..आत्ता सार सार आठवून हसायलाच येत .....
तो वेडा होता पाऊसखुळा
अन मीही नाद्खूळी
असेच नाते पावसाशी या
आठवणी मनात दडलेल्या ....
कॉलेज संपल आणि खर सांगू तो पावसातला निरागसपणाहि संपला ...आता हा सुंदर , निरागस पावसाळा फ़क़्त सुट्टीच्या दिवसात आवडू लागला ..एरव्ही नकोसा वाटायला लागला..किती चिखल, गर्दी, ते ओले कपडे..शी.. आणि वैताग म्हणजे रोज होणारा लेट , आणि लागणारा लेटमार्क , अगदी ट्रेन मध्ये विंडो सीट मिळाली तरीही त्या पावसाच कौतुक करण्यापेक्षा घड्याळाकडे लक्ष जास्त आणि वर बिचार्या पावसाला तड तड बोलन , जणू काही हाच लावतो लेटमार्क ..मग अशा पावसात खरेदीही नको आणि घराबाहेर फिरनही नको ...पण आवडतो बुवा हा पावसाळा.. जेव्हा रेनी पिकनिक असते , तो एकच दिवस जणू अक्खा पावसाळा प्यायला मिळतो , सुखाने ..निवांत ....
किती रूपे या पावसाची , किती आठवणी या पावसाच्या ,, सोबतीला नकोसा वाटणारा आणि दरवेळेस वाट पाह्यला लावणारा ..कधी रिमजिम..कधी धडाम-धूम..कधी संथ. कधी रोद्र रूप, पावसाचे नखरे ..तर कधी करवून घेतलेले लाड ...त्याने दिलेली भजी आणि चहाची खास भेट ..वा .. या पावसाच सारच नीराळ...असा हा पाऊस बघता बघता किती वेळ गेला कळलच नाही ...आणि मग घड्याळाकडे लक्ष गेल ..अरे बापरे !...चांगलाच उशीर झाला होता ..आता रस्ता हि गजबजला होता ..आत्ता मात्र पळयला हव..उगाच या पावसामुळे लेटमार्क व्ह्याचा ......

अस्मी
२७.०८.११

Friday 22 July 2011

ओढ............***


For Some 1...................


पाखरांना ओढ आकाशीची
चांदण्यांना काळोखाची
सावलीला भासाची 
अन मला फ़क़्त तुजी .....
तू भास कि आभास
तू सत्य कि स्वप्न 
तू वारा कि किनारा 
तू निषाद कि मारवा ..
तुज्यासव तिमिर हि उजळते 
डोह माजे गहिरे होते 
डोळ्यात तुज्या मी हरवून जाते 
ओढ अशी तुजी का मला लागते????????? ................
अस्मी 
२२.०७.२०११

Tuesday 19 July 2011

कधी कधी पाऊस.........



कधी कधी पाऊस खुळ्यागत वागतो
तू नसताना अचानक येतो 
चिंब चिंब भिजवून जातो 
उगा वाकुल्या दावतो ........
कधी कधी पाऊस खुळ्यागत वागतो 
तुज्या आठवांना उगा छेडतो
कधी हसवतो अन कधी रडवतो 
कधी अंतर्मुख हि करतो ..........
कधी कधी पाऊस खुळ्यागत वागतो 
पाऊलाना उगा सागरी खेचतो 
सैरावैरा मला घूमवतो 
ओल्या वाळूतिनी मग तो
उगा तुजे नाव कोरत बसतो ............
कधी कधी पाऊस मात्र शहाण्यासारखा वागतो 
चिंब केले तरी ,तुज्या आठवणी मनी जपतो 
अनु पुन्हा पुन्हा येईन मी असाच,
हळूच कानी सांगून जातो ....
कधी कधी पाऊस .....
asmi 
१८.०७.२०११

Monday 18 July 2011

एक नजर तुझ्या प्रेमाची......................​............


एक नजर तुझ्या प्रेमाची
रात्र पारिजातकाची
धुंदल्या  दिशा दाही
हि नशा चांदण्याची..

एक नजर तुझ्या प्रेमाची
हळुवार मोहोरुनी गेली
स्पर्श तुझा होता
हि कळी बहरून आली...

एक नजर तुझ्या प्रेमाची
मी वात जणू समईची
मी गाज धुंद वाऱ्याची
मी लय तुज्या गीतांची.... 



एक नजर तुझ्या प्रेमाची
मी पाखरू भरल्या आकाशी 
झाले एकरूप तुज्या पावसाशी 
हि साक्ष तुज्या माज्या प्रीतीची ...
एक नजर तुज्या प्रेमाची ....

asmi ....

Wednesday 13 July 2011

एक हि पाऊस वेडी ..............


एक सर होती खुळावलेली 
माज्या ओंजळी पडली
माज्याशी खुदकन हसली 
अन पापण्यात विसावली............
एक सूर होता नादावलेला
माज्या ओंठावर आला 
नव्याने तो मला गवसला
माज्या अंतरंगात जीरपला ..............
एक कातरवेळ बावरलेली
जिने कधी तुजी वाट पाहीली
रात्रीच्या गर्दात ती 
रडून कुशीत माज्या विरघळली......
एक वेडी आठव तुज्या माज्यातली
रात्रभर छळत गेली
माज्या एक एक श्वासातुनी 
ती मला बिलगत गेली ......
एक अशी हि  पाऊस वेडी 
तुज्यात गुंतली 
तुज्यासवे  नव्याने एकदा 
पाऊस होऊन दवात भिजली ................
 अस्मी 
१३.०७.२०११

Saturday 9 July 2011

गेल मन पावसात भिजुनी ...............





मेघ झरती झरती आभाळातुनी  
गेल मन पावसात भिजुनी 
वळचणी होत्या कधी तुज्या आठवणी 
झाल्या वाहत्या बघ डोळ्यातुनी 
मेघ झरती झरती आभाळातुनी  
गेल मन पावसात भिजुनी ....!
दाट भरले धुके भवताली 
नभ विसावले तळहाती
शहारती रोम रोम पाती
गंध भरली ओली माती 
मेघ झरती झरती आभाळातुनी  .........!!
धून भरली पाव्यातुनी 
गीत तुजे माज्या ओठातुनी 
स्पंद स्पंद गेला जन्कारुनी 
अंगणी आला मोगरा बहरूनी 
मेघ झरती झरती आभाळातुनी  
गेल मन पावसात भिजुनी ....!!!
कधी झेलला पाऊस तुज्या कवेतुनी 
कधी शहारला तो रोमरोमातुनी 
आज एकटा पाऊस  अन मीही एकटी 
जाहल्या पोरक्या तुज्या माज्या आठवणी 
मेघ झरती झरती आभाळातुनी  
गेल मन पावसात भिजुनी ....!!!!
अस्मी 
०९.०७.२०११

Thursday 7 July 2011

तुजी वाट पाहताना .............







अजूनही थबकते मी याच वळणावर
 तुजी वाट पाहताना 

जिथे कधी झाल्या तुज्या माज्या
 वाटा वेगळ्या  नेहमीकरता 
आयुष्यात अशा अनेक वाटाना 
 पुन्हा पुन्हा फाटे फुटले 
पण याच वाटेवर आहे 
नेमके रुद्याचे शल्य रुतलेले 
अजूनही थबकते मी याच वळणावर तुजी वाट पाहताना ...........
पहिलीत मी आयुष्यात
 नाती बदलत जाताना 
प्रत्येक वळणावर नात्यांच्या 
गरजा पालटताना 
अपेक्षांच्या ओझ्याखाली 
पुन्हा पुन्हा दबताना 
रोजच रोखलंय आसवांना
  तुजी आठवण येताना 
अजूनही थबकते मी याच वळणावर तुजी वाट पाहताना .........
खूप दूर गेल्यास तू
 जिथे साद हि  जाईना
तरी अडतंय पाऊल 
त्या वळणाकडे बघताना 
 पाहिलंय त्या वळणाने 
तुजी माजी पहिली भेट घडताना 
अन पाहिलंय त्याने तुला मला
 कायमच विलगताना  
अजूनही थबकते मी याच वळणावर तुजी वाट पाहताना ............
अस्मी
 ०७.०७.२०११

Wednesday 6 July 2011

मन ग सई माज .....




मन ग सई माज वेड ग वेड पाखरू 
कशी आवरू ग त्याला , कशी ग सई  मी सावरू 
कसा ग सई उडे त्याच्या लई लई आठवणी 
कधी कसे ग धावे , कधी कसे हे ठेचकाळे 
मन ग सई माज वेड ग वेड पाखरू .....
कशी आवरू ग त्याला , कशी ग सई  मी सावरू 
मन ग सई माजे झोका ग झोका होई 
मनाच्या महाली त्याच्या कस फिरुनी फिरुनी येई 
लई घाबरे ग विरहाला, घट्ट घट्ट ग बिलगून राही 
मन ग सई माज वेड ग वेड पाखरू .....
अस्मी 
०७.१०.२००९


ऋतू मागुनी ऋतू हे सरती 
परी तुजी आठवण न सरे
वेड्या मनाला भुलवी कैसे 
जरी कोणी  आणले चंद्र अन तारे .....
पल्याड क्षितिजा तुजे असणे 
परी भासातून तुजे हसणे 
वळवाचा पाऊस खुळा तो 
क्षणात तुजे ते ओघळणे 
ऋतू मागुनी ऋतू हे सरती 
परी तुजी आठवण न सरे...............
पाऊल खुणा हि तुज्या चाहुली 
अभासते मी तुजी सावली 
खोल खोल डोहात गुरफटती 
माज्या मनातल्या तुज्या आठवणी 
ऋतू मागुनी ऋतू हे सरती 
परी तुजी आठवण न सरे......
अस्मी 

तू राजा अन मी राणी ...



प्रीत तुजी नि माजी एक अबोल कहाणी 
चौकटीतल्या या नात्यांच्या तू राजा अन मी राणी 
रोजचेच ते अपुले जगणे , रोजचीच ती वाणी 
गीत कसे मांडावे अपुले त्याच त्यच शब्दांनी 
चौकटीतल्या या नात्यांच्या तू राजा अन मी राणी ....
हात दिला हाती तुजीया संसाराच्या या वळणी 
पसाऱ्यात  पण त्याच्या उरल्या केवळ  आठवणी 
हाती केवळ तडजोडी ,उगा वेडावतो हा चंद्र नभी 
चौकटीतल्या या नात्यांच्या तू राजा अन मी राणी ......
अस्मी 

मन झाले ग बेभान.......

मन झाले ग बेभान.......
डोळ्यातून वाहे सई आठवांचा श्रावण 

कशी आवरू त्याला मन झाले ग बेभान
नभ उतरू उतरू आले 
त्याला आकाशीचे कोंदण 
परी नाही ग सी माज्या मनाला वेसन !
येती सारी जाती बिलगुनी जाई जुईला 
परी राहती कोरड्या कोरड्या आठवणी वळचणीला                                     
नाही ग थारा वारा जिम्माड बावळा
बघ  उडवी कसा .. आठवांचा ग पाचोळा
डोळ्यातून वाहे सई आठवांचा श्रावण 
कशी आवरू त्याला मन झाले ग बेभान..........
अस्मी 
२५.०७.२००९

Tuesday 5 July 2011

Ek Patra Tula Shevtch .....

प्रिय,

माहित नाही तुला आजही प्रिय म्हण्याचा अधिकार मला आहे कि नाही ..तरीही तू प्रियच आहेस ..आजही ...तुला थोड विचित्र वाटेल अस माझ पत्र लिहीन.., पण कधी कधी शब्द मुके होतात आणि मग ते असे कागदावर उमटतात , तुला आजवर कधीही माझा भावना समजल्या नाहीत, तुला माहित नसेल तू माझा जीवनात एखाद्या हवेची झुळूक यावी तसा आलास पण नकळत कधी माझा जीवनात वादळ पसरून निघून गेलास तुला कधी वाटल ही नसेल परत मागे बघाव पण ती दुपार आज हि आठवते....


सर्वत्र शांतता होती ,मधेच पक्षाचं किलबिलाट होत होता आणि ग्रीष्मातल्या कडक उन्हाने तापलेला रस्त्याची झळ जाणवत होती. झाडांची सळसळ मंदावली होती.पाचोळाही निपचित पडला होता , अगदी सारी कवाडे बंद असतानाही झोपाळ्यावर उन्हाची तिरीप पडली होती..पण तो पारवा मात्र मजेत शिळ घालत हिंदळत होता ...

नकळतस कुठूनसा सुसाट्याचा वारा सुटला , त्या सोसाट्याच्या वाऱ्याने सर्व कवाडे ताड ताड उघडली गेली. तो वारा घरभर भिनला, जोराने झोंबला . आणि क्षणार्धात रस्ता ओला चिंब झाला. त्याच येन अंगणभर घुमून राहील ... तो आला अवचित,कसलीही चाहूल न देता , एखाद्या वादळासारखा , मागून मिठी घालणारा तुजा - माझा लाडका पाऊस ....

पण तो नुसताच आला नाही , एक वादळ घेऊन आला , येताना त्या वादळाने मनाची सारी कौलच उडवून दिली.इतके दिवस जपलेल्या कोपऱ्यातला आठवणीचा पालापाचोळा सैरभैर उडाला आणि त्या आठवणी सर्व उधुलून लावल्या. त्या वेचताना पुन्हा एकदा माझे पाय काट्यात रुतले आणि रक्तबंबाळ झाले , तुही असाच आला होतास एखाद्या वादळासारखा, माझी सर्व स्वप्न सार आयुष्य ढवळून निघाल होत ..निरागस शांत मनामध्ये बरीच उलथापालथ झाली होती , सैरभैरल्यागत दिवस होते ते सारे ..
त्या आठवनीच्या मागे धावताना बरेच तुकडे पुन्हा हाताशी आले , झरझर आठवणीने मी मागे गेले , त्याच वळणावर पुन्हा पोहचले , जिथे तू मला सोडून गेला होतास कधी ...

प्रीतीच्या उंबरठ्यावर नुकतच पाऊल ठेवलं होत. आयुष्यातल्या जोडीदाराच्या व्याख्या सुधा नीट उमजत न होत्या आणि तू भेटलास ..तुज्या पहिल्याच नजरेत मी तुझी झाले , तुज्या डोळ्यात स्वताला हरवून बसले , तुझ अशा अवचित क्षणी येण्याने मी बहरले होते स्वतः मध्ये हरपून गेली होती, त्याक्षणी मी स्वतःची ही उरले न्हवते , तुझा मध्ये विलीन झाले होते .. माज्या जोडीदाराच्या चौकटीत तुला बसवल होत ...एवढा विश्वास तुझा वर टाकला होता ....
पण तू एखाद्या फुलपाखरासारखा आलास , विश्वासाने तळहातावर हात ठेवलास आणि मी विश्वासाने तुझा खांद्यावर डोक ठेवणार तितक्यातच वाळूसारखा बोटातून निसटून गेलास मला तिथे एकटीला सोडून ... अरे पण ..

"काही नाती तुटत नाहीत
ती मनाच्या गाभार्यात राहतात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे उडून जातात " पण तुला काय त्याच
ए आठवतंय तुला .. तुज माझ्यासाठी तासंतास वाट पाहन , उशीर झाला कि रागवण अन मी कान पकडल्यावर तुज दिलखुलास हसन आणि कधी मी रागवल्यावर तुज मनवन, मला कुशीत घेऊन समजावन ,पण तुला एक सांगू ? तेव्हा मलाही समजूतदारपणा कधी दाखवावासा वाटलाच नाही तुज्या अशा साम्जाव्ण्यामुळे ;-) अरे पण मी समजूतदार झालेय आत्ता , कारण माजी समजूत घालायला तू नाहीयास न ...
आणि आठवतंय तुला कलत्या सांजेला तुज्या खांद्यावर डोक ठेवून पाहिलेला सूर्यास्त... आजही एकटी तुज्या आभासात त्याचे रंग मी पुन्हा पुन्हा अनुभवते , आपला चांदण्या रात्रीत समुद्रावर फिरन , ती ओली वाळू. तिचा तो ओला स्पर्श आजही तुजी वाट पाहतोय तो सागर , तुज्या मोहक स्पर्शाने माझ शहारण , ती मिटत चाललेली चंद्राची कोर माझा मनामध्ये पुन्हा पुन्हा कोरते मी ...
आठवत नसेलच तुला ....,तू तर अर्ध्यावर सोडून गेलास , आजहि आपली लाडकी रातराणी मलूल होऊन तुजी वाट पाहते , माज्या वाढदिवशी तू दिलेलं गुलाबच रोप त्यानंतर कधी बहरलच नाही. ते आजही तुज्या वाटेकडे डोळे लावून बसल आहे. चुकले का रे काही माझ ? सावरायला , विचारायला वेळच दिला नाहीस ? खूप प्रयत्न केला मी पुन्हा सावरायचा पण तू तर काचेला तडा देऊन निघून गेला होतास. जाताना मात्र पाठीमागे प्रश्न..आणि प्रश्नच ठेवून गेलास .., विचार करून करून मेंदू बधीर झाला , आणि माझे डोळेही तुज्या आठवात फितूर होऊन रात्र रात्र जागत राहिले , कधीही न मिळणाऱ्या उत्तराची चातकापरी वाट पाहत राहिले ..तू हवा होतास इथे या कोसळणाऱ्या पावसाला आवरायला ...

मला काहीच सुचेनास झाल होत आणि माझी पाऊले आपसूकच समुद्राकडे वळली , भान हरपले होते.. वाऱ्यासारखी भरकटत होते समुद्रात नाव जशी भरकतावी तशी मी त्या सागराकडे ओडली जात होते ..
....!कोसळणारा पाऊस मी म्हणत होता , तो अंगभर सुयान्सारखा टोचत होता आणि डोळ्यातले अश्रू मन भिजवून टाकत होते , मी वेड्या सारखी चालतच होते वाट फुटेल तिथे आणि अचानक माज पाऊल थांबल, पुन्हा एकदा समाजाच्या रीतीभातीच्या उंबरत्यावर , मी वळले मागे ..

आणि तसही , " पुन्हा पावसाला सांगायचे , भिजुनी घरी रोज परतायचे " हे ठाऊक होत मला ..मग मीही वळले , हा पाऊस मनात भरून पुन्हा एकदा ...नव्याने तुजी वाट पाहण्याकरता , नव्याने हा बेभान पाऊस झेल्ण्याकर्ता ...मी परतले होते तुज्या माज्या लाडक्या रातराणीला श्वास देण्याकरता ..मी परतले होते..आणि तसही , "काही क्षण हसरे असतात ते पकडता येत नाही म्हणून रुसायचं नसत, हा आठवणीचा पाऊस मनात दाटून येताना मिटायच नसत ...कदाचित म्हणूनच मी परतले होते .

आता इतकच कर , मी अनंतात विलीन होताना तरी एकदा ये ... माज्या प्रेताला घट्ट कवटाळून माज्यावर उधळलेल्या प्रेमाची साक्ष दे , उर भरून रडून घे, तेच अश्रू साथ देतील मला माज्या अंतापासून .. अनंतापर्यंत ..
करशील न एवड...
येशील न पुन्हा माघारी त्याच वळणावरी...

तुझीच
xxx

Monday 4 July 2011

व्यवहार.....











मला एक किनारा हवा होता 
तू फ़क़्त फटकारनाऱ्या लाटा दिल्यास 
मला हवा होता शीतल गारवा
तू फ़क़्त ग्रीष्माच्या झळा दिल्यास ......
काय गमावले मी काय कमावले 
तुज्यापायी आयुष्य खर्ची घालून
काय साध्य केले .......
कधी जुळल्याच नाहीत आपल्या वाटा
कधी जुळलेच नाहीत सूर 
भातुकलीचा डाव सारा 
कधी रंगलाच नाही नूर .........
आत्ता फ़क़्त धुरकट सोबत आहे 
दोघांमध्ये अस्पष्टशी भिंत आहे 
काचेला तडा केव्हाच गेलाय 
केवळ आत्ता संसाराचा व्यवहार उरला आहे .....
अस्मी ..
०५.०७.२०११

ऐकणारे ...ऐकणारे ...ऐकणारे....







चिंब भिजलेल्या 
वाट चुकलेल्या  माज्या मना 
ऐकणारे ...ऐकणारे ...ऐकणारे .................
साद घाली मला 
हा नखरेल वारा 
ओढी मला  
या सागर लाटा
जाऊ कुठे सांग ना रे..सांग ना रे ...सांग ना रे
वाट चुकलेल्या  माज्या मना 
ऐकणारे ...ऐकणारे ........!
तो असा तो तसा 
तो... सळसळत्या  धारा 
तो भास हा आभास हा 
तो माजा किनारा 
जाऊ कुठे तुज्याविना रे ...तुज्याविना रे ......
ऐक नारे ऐकणा रे माज्या मना ,माज्या मना ....................
वाट चुकलेल्या  माज्या मना 
ऐकणारे ...ऐकणारे !!
तो पाऊस कोसळणारा 
तोस्पर्शाचा ओला शहारा 
तो माज्या मनीचा कवडसा 
त्याच्या विना हा जन्म बावरा  
ऐक नारे ऐकणा रे माज्या मना , माज्या मना ....................
चिंब भिजलेल्या 
वाट चुकलेल्या  माज्या मना 
ऐकणारे ...ऐकणारे .........................!!!!
अस्मी 
०३.०७.२०११

Friday 1 July 2011

शेवटचा फोन ....***







शेवटचा फोन ....
आजही तिचा फोन वाजला
तीच परिचित रिंग आणि तोच परिचित नंबर
तिची तीच अधीरता आणि श्वासाचं अंतर ...
तोच हुंकार त्याचा कानी आला
जणू तिच्या जीवात जीव आला
चेहरा खुलला , मारवा जन्कारला
जीरपत गेला आवाज पलीकडला ....
पण तेच होते बोलणे अन तेच होते सांगणे
जीव चोरून पुन्हा पुन्हा तेच होते ऐकणे
तोच होता सूर समजावनीचा त्याचा
आणि तिचा निचय ना समजण्याचा ....
पुन्हा पुन्हा येत होत आभाळ दाटून
आवाज जात होता हळू हळू विरून ...
"बोलन आपलं शेवटच ...संपल सार आत्ता
कधीच येणार नाही फोन माजा आत्ता तुला ....
मग तो बोलताच होता कितीतरी वेळ
तिला लागताच न्हवता कशाचाच मेळ
मग कधीतरी फोन त्याने दिला होता ठेवून
ती मुकी बाहुली गेली होती कोसळून ....
फोन आत्ता त्याचा कधीच येणार न्हवता
जीव आत्ता तिचा कधीच, कुठेच गुंतणार न्हवता .....
अस्मी
१२.०५.२०११

Thursday 30 June 2011

तो आजही तसाच आहे.....***





तो आजही तसाच आहे 

जसा कधी पूर्वी होता 
हसरा,खेळकर 
थोडासा मुडी, थोडासा चीडकर ....
कवितेत  रमणारा 
पावसाशी बोलणारा 
तासंतास बासुरीशी खेळणारा 
सुरात न्हाणारा 
तो आजही तसाच आहे .....
आजही तो वळणापाशी येतो 
क्षणभर का होईना 
माजी वाट पाहतो 
घुटमळतो  , रेंगाळतो 
अन शेवटच्या पत्थरावर  गुलाब ठेवून जातो ...
तो आजही तसाच आहे 
 मी मात्र बदलले 
त्याच्या एकाच  मूक नकाराने  
तुटले ,दुखले ,संतापाने फडफडले 
साऱ्या वाटाच बंद करून 
मी मात्र मोकळी झाले ....
तो शांत ,हतबल मनाला समजावत राहिला 
या जन्मी नाही पुढच्या भेटू ग सांगत राहिला 
मी मात्र दूर गेले 
जगापासून जणू अलिप्तच राहिले .....
तरीही तो अजून तसाच आहे .......
अस्मी 
३०.०६.11

Tuesday 28 June 2011

आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात.....My Most Fav. Poem





आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात.....

आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात
कधी मेसेज  मधून तर कधी इमेल मधून...
एकमेकांच्या अधूनमधून संपर्कात असतात...

एकमेकांची खबर ठेवणे आजही त्यांनी सोडलेले नाही,
समोरच्याला इग्नोर करणं आजही त्यांना जमलेलं नाही..
जरा काही खट्ट झाल कि एकमेकांची काळजी करत बसतात.. 
कारण आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात......

पण आता पुर्वीसारख ते एकमेकांना फोन करत नाहीत,
जर फोन केलाच कोणी तर काय बोलयाच हे दोघानाही सुचत नाही..
मग फोन वर उगाचच ते शब्दांशी खेळत बसतात...
जेव्हा आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात....

त्या दोघांना वेगळ होऊन बरेच महिने झालेत.. 
आता ते फक्त चांगले मित्र म्हणून राहिलेत..
तरीही कधी कधी जुन्या आठवणी मना मध्ये हळूच डोकावतात...
 जेव्हा आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात....
ती टेन्शन मध्ये असली कि तिचा पहिला फोन त्यालाच असतो..
तोही सगळी कामे बाजूला सारून तिच्यासाठी हाजीर राहतो..
कारण त्याला माहित असत..
फार काही झाल्याशीवाय तिचा आवाज कातर नसतो...
आणि त्याच्या इतकं जवळच अजूनही तीच कोणीच नसत ..
मग नकळत  ते एकमेकांसाठी बैचैन होतात ..
 कारण आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात....

त्याच्या साठी कधी कधी ती हि कासावीस होते...
विसर विसर म्हणता म्हणता त्याचीच होऊन राहते..
पण तिच्या भावना ती शब्दात कधीच मांडत नाही..
आणि तो हि बोलताना तिच्या डोळ्यात कधीच बघत नाही..
अस न बोलताच ते एकमेकांना खूप समजून घेतात.. 
जेव्हा आज ते कधीकधी एकमेकांशी बोलतात....

दूर जाताना दिलेलं मैत्रीचं वचन ते अस नेहमीच पाळतात..
आणि म्हणूनच आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात....

asmi 

एक किनारा ....



एक किनारा ....
एक किनारा मजला केव्हाचा साद घालीत होता
पाव्याच्या त्याच्यातून तो मला आळवीत होता ..
मी दूर कुठे शोधीत होते
कसले मृगजळ कुणास ठावूक
मी होते धुंदीत माज्या
अन मजसाठी तो उगाच भावूक....
परी ते होते मृगजळ.. संपले सारे
सगे सोयरेही मागे सरले
भरले डोळे.. ओळी स्पंदने
भरकटत  होती उगा पावले ...
वळले मागे कधीतरी ..तर तोच किनारा
आजही साद घालीत होता मजला
मग मीही  टाकली पाऊले
त्यात सामावया........
अस्मी
१४.०५.२०११
 

THINK OF U... ***



 THINK OF U... 
When the sun sets far into the ocean-and
The night brings back loneliness
I THINK OF U.
The moon shines in the endless sky-and
The stars shiver in the distance they whisper-and
I THINK OF U.
When the rain drop bends the petals-and
Slips down kissing them
I THINK OF U.
In the morning when the dew drops rest on the leaves making them feel warm and content
I THINK OF U.
When the cool breeze touches me every second
I THINK OF U.
And-miss your touch, your kiss and most of all i miss you.


मी ठरवलंय आत्ताशा......***







मी ठरवलंय आत्ताशा,
तुज्यापासून दूर व्हायचं 
जाणून बुजून तुज असण ,
अन तुज्याशी बोलन टाळायच 
मी ठरवलंय आत्ताशा ....
तुज्या आठवणीना लोटायचं दूर ,
थोपवायचा  डोळ्यातला पूर 
भरू द्यायचा नाही उगाच उर,
तुज्या रंगातला बदलायचा नूर... 
मी ठरवलंय आत्ताशा ...........

नकोच आत्ता तुजी वाट पाहण,
प्रेमासाठी चातकापरी जागण
रात्र रात्र ओलेत्या डोळ्यांनी आस धरण,
अन नकोच हे लाचारीच जीण
मी ठरवलंय आत्ताशा ....

दूर दूर जायचं आत्ता , 
जिथे तुजे ढग नसतील
आकंठ भिजेन मी ..
पण तुज्या सरी नसतील 
ठाऊक नाही अशी जाईन कुठवर ,
घातलीस कधी साद तरी ऐकू येणार नाही 
कदाचित इतकी दूरवर ...
कारण ..कारण..
मी ठरवलंय आत्ताशा 
तुज्यापासून दूर व्हायचं ...

अस्मी
२६.०५.२०११

श्वास माझा ......***







श्वास माझा ..***
नसतोस जेव्हा तू सामोरी, भास तुजा अडखलतो  
या भासाभोवती तुज्या श्वास माझा  झुरतो
दूर देशी खुळ्यागत डोळे लावून बसतो
स्वतीशीच मग तो स्तब्ध होवुनी राहतो
नसतोस जेव्हा तू सामोरी....
तो हसतो रडतो तुज्या मल्हाराला गातो   
गुंतलेल्या तुज्या श्वासांना सोडवू पाहतो 
तो थकतो , लपतो , अंगभर मोहरतो 
क्षणा क्षणाला तुजी वाट पाहतो 
नसतोस जेव्हा तू सामोरी...
वेडा श्वास माझा कसा उगा थांबतो 
आठवणीत तुज्या का असा  घुसमटतो  
येवून जा माघारी एकदा तुला विनवतो 
मोकळ कर मजला आता तुला अर्जीतो
नसतोस जेव्हा तू सामोरी ...
अस्मी
१२.०४.2011

माझे प्रेम .........***











माझे  प्रेम  ***
कधी जे गीत माजे होते 

आज सूर त्यांचे लागले वेगळे 
श्रावणातल्या सरी कधी होत्या माज्या 
त्यांचे रिमझिमने  आज निराळे ....
माजीच मी झाले तिऱ्हाईत आज 
नियतीने  उन्हात घर माजे बांधले ...
पाहून त्याला सुखात मी परी 
तृप्त मनाने हसले ...
होईन मंजिरी मी ,खोड चंदनाचा 
होईन प्रकाश मी जळणाऱ्या समईचा
जाणिला  अर्थ मी आज खऱ्या प्रेमाचा 
 घेण्यात सुख नाही अर्थ खरा देण्याचा .......
अस्मी 
२१.०६.२०११