श्वास माझा ..***
नसतोस जेव्हा तू सामोरी, भास तुजा अडखलतो
या भासाभोवती तुज्या श्वास माझा झुरतो
दूर देशी खुळ्यागत डोळे लावून बसतो
स्वतीशीच मग तो स्तब्ध होवुनी राहतो
नसतोस जेव्हा तू सामोरी....
तो हसतो रडतो तुज्या मल्हाराला गातो
गुंतलेल्या तुज्या श्वासांना सोडवू पाहतो
तो थकतो , लपतो , अंगभर मोहरतो
क्षणा क्षणाला तुजी वाट पाहतो
नसतोस जेव्हा तू सामोरी...
वेडा श्वास माझा कसा उगा थांबतो
आठवणीत तुज्या का असा घुसमटतो
येवून जा माघारी एकदा तुला विनवतो
मोकळ कर मजला आता तुला अर्जीतो
नसतोस जेव्हा तू सामोरी ...
अस्मी
१२.०४.2011
No comments:
Post a Comment