Thursday 30 June 2011

तो आजही तसाच आहे.....***





तो आजही तसाच आहे 

जसा कधी पूर्वी होता 
हसरा,खेळकर 
थोडासा मुडी, थोडासा चीडकर ....
कवितेत  रमणारा 
पावसाशी बोलणारा 
तासंतास बासुरीशी खेळणारा 
सुरात न्हाणारा 
तो आजही तसाच आहे .....
आजही तो वळणापाशी येतो 
क्षणभर का होईना 
माजी वाट पाहतो 
घुटमळतो  , रेंगाळतो 
अन शेवटच्या पत्थरावर  गुलाब ठेवून जातो ...
तो आजही तसाच आहे 
 मी मात्र बदलले 
त्याच्या एकाच  मूक नकाराने  
तुटले ,दुखले ,संतापाने फडफडले 
साऱ्या वाटाच बंद करून 
मी मात्र मोकळी झाले ....
तो शांत ,हतबल मनाला समजावत राहिला 
या जन्मी नाही पुढच्या भेटू ग सांगत राहिला 
मी मात्र दूर गेले 
जगापासून जणू अलिप्तच राहिले .....
तरीही तो अजून तसाच आहे .......
अस्मी 
३०.०६.11

Tuesday 28 June 2011

आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात.....My Most Fav. Poem





आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात.....

आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात
कधी मेसेज  मधून तर कधी इमेल मधून...
एकमेकांच्या अधूनमधून संपर्कात असतात...

एकमेकांची खबर ठेवणे आजही त्यांनी सोडलेले नाही,
समोरच्याला इग्नोर करणं आजही त्यांना जमलेलं नाही..
जरा काही खट्ट झाल कि एकमेकांची काळजी करत बसतात.. 
कारण आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात......

पण आता पुर्वीसारख ते एकमेकांना फोन करत नाहीत,
जर फोन केलाच कोणी तर काय बोलयाच हे दोघानाही सुचत नाही..
मग फोन वर उगाचच ते शब्दांशी खेळत बसतात...
जेव्हा आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात....

त्या दोघांना वेगळ होऊन बरेच महिने झालेत.. 
आता ते फक्त चांगले मित्र म्हणून राहिलेत..
तरीही कधी कधी जुन्या आठवणी मना मध्ये हळूच डोकावतात...
 जेव्हा आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात....
ती टेन्शन मध्ये असली कि तिचा पहिला फोन त्यालाच असतो..
तोही सगळी कामे बाजूला सारून तिच्यासाठी हाजीर राहतो..
कारण त्याला माहित असत..
फार काही झाल्याशीवाय तिचा आवाज कातर नसतो...
आणि त्याच्या इतकं जवळच अजूनही तीच कोणीच नसत ..
मग नकळत  ते एकमेकांसाठी बैचैन होतात ..
 कारण आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात....

त्याच्या साठी कधी कधी ती हि कासावीस होते...
विसर विसर म्हणता म्हणता त्याचीच होऊन राहते..
पण तिच्या भावना ती शब्दात कधीच मांडत नाही..
आणि तो हि बोलताना तिच्या डोळ्यात कधीच बघत नाही..
अस न बोलताच ते एकमेकांना खूप समजून घेतात.. 
जेव्हा आज ते कधीकधी एकमेकांशी बोलतात....

दूर जाताना दिलेलं मैत्रीचं वचन ते अस नेहमीच पाळतात..
आणि म्हणूनच आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात....

asmi 

एक किनारा ....



एक किनारा ....
एक किनारा मजला केव्हाचा साद घालीत होता
पाव्याच्या त्याच्यातून तो मला आळवीत होता ..
मी दूर कुठे शोधीत होते
कसले मृगजळ कुणास ठावूक
मी होते धुंदीत माज्या
अन मजसाठी तो उगाच भावूक....
परी ते होते मृगजळ.. संपले सारे
सगे सोयरेही मागे सरले
भरले डोळे.. ओळी स्पंदने
भरकटत  होती उगा पावले ...
वळले मागे कधीतरी ..तर तोच किनारा
आजही साद घालीत होता मजला
मग मीही  टाकली पाऊले
त्यात सामावया........
अस्मी
१४.०५.२०११
 

THINK OF U... ***



 THINK OF U... 
When the sun sets far into the ocean-and
The night brings back loneliness
I THINK OF U.
The moon shines in the endless sky-and
The stars shiver in the distance they whisper-and
I THINK OF U.
When the rain drop bends the petals-and
Slips down kissing them
I THINK OF U.
In the morning when the dew drops rest on the leaves making them feel warm and content
I THINK OF U.
When the cool breeze touches me every second
I THINK OF U.
And-miss your touch, your kiss and most of all i miss you.


मी ठरवलंय आत्ताशा......***







मी ठरवलंय आत्ताशा,
तुज्यापासून दूर व्हायचं 
जाणून बुजून तुज असण ,
अन तुज्याशी बोलन टाळायच 
मी ठरवलंय आत्ताशा ....
तुज्या आठवणीना लोटायचं दूर ,
थोपवायचा  डोळ्यातला पूर 
भरू द्यायचा नाही उगाच उर,
तुज्या रंगातला बदलायचा नूर... 
मी ठरवलंय आत्ताशा ...........

नकोच आत्ता तुजी वाट पाहण,
प्रेमासाठी चातकापरी जागण
रात्र रात्र ओलेत्या डोळ्यांनी आस धरण,
अन नकोच हे लाचारीच जीण
मी ठरवलंय आत्ताशा ....

दूर दूर जायचं आत्ता , 
जिथे तुजे ढग नसतील
आकंठ भिजेन मी ..
पण तुज्या सरी नसतील 
ठाऊक नाही अशी जाईन कुठवर ,
घातलीस कधी साद तरी ऐकू येणार नाही 
कदाचित इतकी दूरवर ...
कारण ..कारण..
मी ठरवलंय आत्ताशा 
तुज्यापासून दूर व्हायचं ...

अस्मी
२६.०५.२०११

श्वास माझा ......***







श्वास माझा ..***
नसतोस जेव्हा तू सामोरी, भास तुजा अडखलतो  
या भासाभोवती तुज्या श्वास माझा  झुरतो
दूर देशी खुळ्यागत डोळे लावून बसतो
स्वतीशीच मग तो स्तब्ध होवुनी राहतो
नसतोस जेव्हा तू सामोरी....
तो हसतो रडतो तुज्या मल्हाराला गातो   
गुंतलेल्या तुज्या श्वासांना सोडवू पाहतो 
तो थकतो , लपतो , अंगभर मोहरतो 
क्षणा क्षणाला तुजी वाट पाहतो 
नसतोस जेव्हा तू सामोरी...
वेडा श्वास माझा कसा उगा थांबतो 
आठवणीत तुज्या का असा  घुसमटतो  
येवून जा माघारी एकदा तुला विनवतो 
मोकळ कर मजला आता तुला अर्जीतो
नसतोस जेव्हा तू सामोरी ...
अस्मी
१२.०४.2011

माझे प्रेम .........***











माझे  प्रेम  ***
कधी जे गीत माजे होते 

आज सूर त्यांचे लागले वेगळे 
श्रावणातल्या सरी कधी होत्या माज्या 
त्यांचे रिमझिमने  आज निराळे ....
माजीच मी झाले तिऱ्हाईत आज 
नियतीने  उन्हात घर माजे बांधले ...
पाहून त्याला सुखात मी परी 
तृप्त मनाने हसले ...
होईन मंजिरी मी ,खोड चंदनाचा 
होईन प्रकाश मी जळणाऱ्या समईचा
जाणिला  अर्थ मी आज खऱ्या प्रेमाचा 
 घेण्यात सुख नाही अर्थ खरा देण्याचा .......
अस्मी 
२१.०६.२०११

विसरला नसशीलच तू ती खुळावलेली वेळ ..!













विसरला   नसशीलच तू ती खुळावलेली वेळ ..!

विसरला  नसशीलच तू ती खुळावलेली वेळ
ऐन भरात आला होता उनपावसाचा खेळ
त्या स्वप्निल चांदण्यात मी उभी पेटले  होते
पहिल्यांदा जेव्हा मी तुला भेटले होते....
 
आठवतायंत का तुला आपल्या नजरांमधील कोडी
प्रश्न होते खूप पण वेळ होती थोडी
आठवतायेत का तुला ते धुंदावलेले गंध
शपथांच्या खेळातले ते लोभसवाणे छंद......
एकांतीचे शब्द शांततेनी खोडले होते
जसे मेघांनी ग्रीष्माचे संसार मोडले होते
मग एकदा असाच मी  केला होता फोन
मौनाच्या पडद्याआड रडलं होतं मज मन ....

तू रडला  नाहीस  फक्त हसलास  खिन्न
व्यथा होती एकच पण कथा होत्या भिन्न
पत्त्यांचा बंगलाच तो कधीतरी पडणार
एक खड्डा बुजवायला दुसरा खड्डा असणार
आता जपून ठेव हे आयुष्यभराचं वाक्य
"नियतीचं प्रेमाशी कधी जमत नाही सख्य".....

अक्षता झेलत झेलत आता संसारात रमशील
टाचांना कुरवाळत नभाशी बोलशील
मळभ होईल दूर विरून जातील मेघ
आकाशीचे ग्रह तुजे  घेतील पुन्हा वेग....

दिवस असे सरून जाताना वाडत चालंय अंतर
कळतंय तात्पर्य नसतं अश्या कथेला.. कधीच नसतो 'नंतर'
हळद , अक्षता , सनई तिघी एकत्र नांदल्या
पण माज्या व्यथा सा-या 
 'तुज्या आणि तिच्या '  "MARRIAGE CERTIFICATE  पाशी सांडल्या ...
asmi 
04.12.2010

Thursday 23 June 2011

तू भेटलास पुन्हा नव्याने......





तू भेटलास पुन्हा नव्याने......
 
तू भेटलास पुन्हा एकदा नव्याने
 धूसर झालेल्या त्याच ओलेत्या वाटेने
क्षण क्षण सारे त्यात पुन्हा विरून गेले 
श्वास काही सुटलेले पुन्हा गेले वेचले ..
तू भेटलास पुन्हा  एकदा नव्याने......

 
तोच  होता चेहरा तुझा अन  तेच होते डोळे 
पण हसू नव्हते  नेहमीचे ,न्हवते ओळखीचे,
भाव होते डोळ्यातले तेच कधी पूर्वीचे..
पण दिसले नाही मलाच प्रतिबिंब माझे ..
तू भेटलास पुन्हा  एकदा नव्याने......
 
तू होतास सोबत माझ्या पण मन पाखरू झाले होते.. 
स्पर्शाचे ही अपुल्या अंतर वाढले होते..
होतास कधी तू माझा पण काही जाणवले होते..
तुझे माझे पुढचे रस्ते आता वेगळे होते...
तू भेटलास पुन्हा  एकदा नव्याने......
पुन्हा हरवण्यासाठी ............

- अस्मि
२२.०३.2011

Wednesday 22 June 2011

पैलतीराच्या काठावरती




पैलतीराच्या काठावरती





पैलतीराच्या काठावरती चल खेळ मांडूया नवा ,
भातुकली नवीन सारी, पटलावरचा  डाव नवा
नवा गडी, नवा सोबती, नको स्पर्श भूतकाळाचा
डाव मोडला होता कधी ये पुन्हा सावरूया
पैलतीराच्या काठावरती चल  खेळ मांडूया नवा.....,
 
नवा संसार , नव्या आशा , उमटवूया नव्या  पाऊलखुणा
नको जुन्या आठवांच्या बेड्या , नकोच जुना हुंदका
साथ दे मजला आत्ता नव्याने फुलाया
शब्द दे मजला .. नव्याने हा उखाणा सोडवाया
पैलतीराच्या काठावरती चल  खेळ मांडूया नवा.....,
 
हात  दे मजला तुज्या माज्यातला उंबरठा ओलांडाया
जग दे मजला नवे हक्काने श्वास घेण्या
आकाश दे मजला नवे ..मुक्त विहराया
नजर दे नवी मजला  क्षितिजाचा ठाव घेण्या ...
पैलतीराच्या काठावरती चल  खेळ मांडूया नवा....
 
 
by Asmi
03.02.2011

Tuesday 21 June 2011

माझे प्रेम .........***
















.




कधी जे गीत माजे होते 
आज सूर त्यांचे लागले वेगळे 
श्रावणातल्या सरी कधी होत्या माज्या 
त्यांचे रिमझिमने  आज निराळे ....
माजीच मी झाले तिऱ्हाईत आज 
नियतीने  उन्हात घर माजे बांधले ...
पाहून त्याला सुखात मी परी 
तृप्त मनाने हसले ...
होईन मंजिरी मी ,खोड चंदनाचा 
होईन प्रकाश मी जळणाऱ्या समईचा
जाणिला  अर्थ मी आज खऱ्या प्रेमाचा 
 घेण्यात सुख नाही अर्थ खरा देण्याचा .......
अस्मी 
२१.०६.२०११

Monday 20 June 2011

पुर्वीसारख पाऊल थांबत नाही,






पुर्वीसारख पाऊल थांबत नाही,
 तुला समोर पाहिल्यावर, 
आता ते अडखळत नाही,
 पुन्हा पुन्हा तुज्या वळणावर .., 
पुर्वीसारख मन आत्ता जागत नाही,
 रात्र रात्र तुज्या विचारात, 
कदाचित त्यालाही कळलय,
 तू नाहीयस आत्ता सोबत...,
 पुर्वीसारख उरलंच नाही काही, 
गुणाकार काय आत्ता वजाबाकीही करवत नाही,
 रीत रीत मन आत्ता घुसमटत नाही,
 ओंजळ भरून प्राजक्त आत्ता वाहतहि नाही ..., 
पण पूर्वीसारखाच दिवा मात्र तेवतो, 
रात्रंदिन मनाच्या गाभाऱ्यात, 
अन जळत जातो कण कण.............., 
परी आत्ता हुंकारही येत नाही .................,
 खरच आत्ता पूर्वीसारखा पाऊल थांबत नाही,
 तुला समोर पाहिल्यावर .....,
 आता ते अडखळत नाही,
 पुन्हा पुन्हा तुज्या वळणावर .., 
asmi, 
06.06.2011

सोबत नसते कधीच कोणी....***


सोबत नसते कधीच कोणी
जीव एकलाच असतो रे ....
साथ द्यायला असते कोणी
तो तर निव्वळ भ्रम असतो रे
जिथे नसते सावली आपुलीच आपली रे
काय सांगावे सगे सोयरे असतील आपुलेच रे 
सोबत नसते कधीच कोणी
जीव एकलाच असतो रे ....
मार्ग धरावा आपुलाच आपण
घेऊन सोबत अपुल्याच सुख दुखाला रे
तळे डोळ्यातले एकच खरे
बाकी सारे मृगजळ रे ...
सोबत नसते कधीच कोणी
जीव एकलाच असतो रे ...

Saturday 18 June 2011

हा पहिला थेंब पावसाचा



हा पहिला थेंब पावसाचा
तळहातावर पडला ,
अन  स्पर्श तुजा जुनाच
नव्याने मोहरला !
हा पहिला थेंब पावसाचा .....
तो  होऊन गुलाबी शहारा
तुज्या विरहात जुरला ,
होऊन सरी मग तो
अविरत बरसला!!
हा पहिला थेंब पावसाचा .....
हा चिंब चिंब भिजलेला
मनास बिलगून गेला
एक जुनी आठव
पुन्हा हिरवी करून गेला ....
हा पहिला थेंब पावसाचा ..........................

अस्मि