Sunday 28 March 2021

अस्तित्व

 हा एक अनुभव आहे ..तुमच्या माझ्या  एका मैत्रिणीचा ..


"ते "खुणावत होत तिला कधीच ..त्याच रंगरूप नीटसं दिसत न्हवत .. कळत ही न्हवत ..पण जे काही होत ते खूप प्रभावी होत ..पण नेमक काय तेच कळत न्हवत ना तिला ..ना तिच्या आजूबाजूला असणाऱ्या तिच्या लोकांना ..त्यांना तर त्याची साधी जाणीव ही न्हवती म्हणा ..

पण तिला जाणवत असूनही अंगळवणी पडलेलं दुर्लक्ष ...

आणि कसं बघणार .. लहानपणापासून.. हो ला हो करावं लागतं..संसारात पडल्यावर स्वतः  अस नसत.. स्वतः च्या शिक्षणाला फार महत्त्व द्यायचं नाही ..स्वतःची बाजू नेहमी  पडतीच ठेवावी ..सतत कानावर..मग त्यात स्वतःच स्वप्न पाहायला आणि ती पूर्ण करण्याची अपेक्षा ठेवायला कुठे धीर झाला तिला .. वर्षा  मागून वर्ष गेली ... चूल मुल.. हौसेसाठी अल्पावधीची नोकरी ..पण तीही नवऱ्याच्या नियमात बसणारी ..ती.. ती आहे हेच मुळी विसरत गेलेली ...तिच्या भोवतालच
जबाबदरीच कुंपण इतकं घट्ट घालून ठेवलेलं की ते खुणावणारे क्षितिज बितिज फक्त पुस्तकातच राहिलं..ती शेवटपर्यंत अस्वस्थ राहिली ..की ते खुणावणार काय होत ..कधी मिळेल का मला ..आताशी चाळिशी पार केली तिने ..नाही म्हटलं तरी सगळ्यांनी खूप हौसेने celebration केलं..तिला काही भेटवस्तू मिळाल्या ..आणि त्यात एक पुस्तक तिच्या हाती लागलं...अस्तित्व""...तिचे डोळे चमकले..इतक्या वर्षानंतर त्यात काहीतरी गवसल्याचा आनंद दिसला ..अस्तित्व?????? ..हेच ....हेच तर ती शोधत होती ..इतकी वर्ष ..कुंपणाच्या पल्याड हेच तर खुणावत होत तिला ..कसं कळलं नाही ..तिने पक्क मनाशी काहीतरी मांडलं... आणि तिने इथून पुढे काही जबाबदाऱ्या न स्वीकारता गाण्यासाठी थोडा का होईना वेळ द्यायचा हे ठरवलं ...कारणं संगीत तिचा श्वास होता ..जो आजवर तिने कधी घेतलाच न्हवता ..श्वास हि ती मोजून घ्यायची ना :) नवऱ्याने मापून दिलेल्या मापात..ती स्वतःशीच हसली .. गाणं शिकता शिकता तिला तीच अस्तित्व सापडायला लागलं..त्याला रंग रूप दिशा मिळाली ..आज ती स्वतः गाणं शिकवते .. संगीत teacher म्हणून ओळखली जातेय..तीच अस्तित्व.. तिची ओळख ..पण प्रवास सोप्पा न्हवता ..जिद्दीचा होता ...पण जिला अस्तित्वाची ओढ लागते ..तिच्यासाठी सगळं सोप्प होत.....

फक्त तिला कुंपण घालू नका ..लेबल लावू नका ..तिला पूर्ण समजल्याशिवाय तिच्यावर शेरे ओडू नका ...तिला साथ द्या ..अस्तित्व शोधण्यासाठी ........