मेघ झरती झरती आभाळातुनी
गेल मन पावसात भिजुनी
वळचणी होत्या कधी तुज्या आठवणी
झाल्या वाहत्या बघ डोळ्यातुनी
मेघ झरती झरती आभाळातुनी गेल मन पावसात भिजुनी ....!
दाट भरले धुके भवताली
नभ विसावले तळहाती
शहारती रोम रोम पाती
गंध भरली ओली माती
मेघ झरती झरती आभाळातुनी .........!!
धून भरली पाव्यातुनी
गीत तुजे माज्या ओठातुनी
स्पंद स्पंद गेला जन्कारुनी
अंगणी आला मोगरा बहरूनी
मेघ झरती झरती आभाळातुनी
गेल मन पावसात भिजुनी ....!!!
कधी झेलला पाऊस तुज्या कवेतुनी
कधी शहारला तो रोमरोमातुनी
आज एकटा पाऊस अन मीही एकटी
जाहल्या पोरक्या तुज्या माज्या आठवणी
मेघ झरती झरती आभाळातुनी
गेल मन पावसात भिजुनी ....!!!!
अस्मी
०९.०७.२०११
No comments:
Post a Comment