Thursday, 30 June 2011

तो आजही तसाच आहे.....***





तो आजही तसाच आहे 

जसा कधी पूर्वी होता 
हसरा,खेळकर 
थोडासा मुडी, थोडासा चीडकर ....
कवितेत  रमणारा 
पावसाशी बोलणारा 
तासंतास बासुरीशी खेळणारा 
सुरात न्हाणारा 
तो आजही तसाच आहे .....
आजही तो वळणापाशी येतो 
क्षणभर का होईना 
माजी वाट पाहतो 
घुटमळतो  , रेंगाळतो 
अन शेवटच्या पत्थरावर  गुलाब ठेवून जातो ...
तो आजही तसाच आहे 
 मी मात्र बदलले 
त्याच्या एकाच  मूक नकाराने  
तुटले ,दुखले ,संतापाने फडफडले 
साऱ्या वाटाच बंद करून 
मी मात्र मोकळी झाले ....
तो शांत ,हतबल मनाला समजावत राहिला 
या जन्मी नाही पुढच्या भेटू ग सांगत राहिला 
मी मात्र दूर गेले 
जगापासून जणू अलिप्तच राहिले .....
तरीही तो अजून तसाच आहे .......
अस्मी 
३०.०६.11

No comments:

Post a Comment