Tuesday 23 April 2013

काल आलास मिठीत ....


काल आलास मिठीत गर्द अंधार होऊन
खेळत राहिलास सावली होऊन
भरलास चंद्र नजरेत हातात हात घेऊन
उलगडलीस रेशमाची लडी ओंठाना ओठ लावून
काल आलास मिठीत गर्द अंधार होऊन

खेळत राहिलास सावली होऊन …
बोलत राहिलास अविरत
चाळा मिटल्या पापण्यांशी
गुंफत राहिलास कविता
गाज भरल्या लाटेची
काल आलास मिठीत गर्द अंधार होऊन

खेळत राहिलास सावली होऊन …
मी विरघळत राहिले तुज्यात मौन होऊन
खोल खोल डोहाचा श्वास होऊन
तू पीत राहिलास मला तृप्त होऊन
ओंजळीतले मोती सांडले ओंजळ भरून
काल आलास मिठीत गर्द अंधार होऊन
खेळत राहिलास सावली होऊन …
कळलच नाही "तो " आला कधी कवाडातून
झाली सैल मिठी ,"तो " हसला मनातून
तू ओडला गेलास त्याच्या कह्यात ,
मी पुन्हा एकदा अपूर्णात ..
निशब्द पाहत राहिले तुज विरघळण माज्याच नजरेतून ...
निशब्द पाहत राहिले तुज विरघळण माज्याच नजरेतून ...