ऋतू मागुनी ऋतू हे सरती
परी तुजी आठवण न सरे
वेड्या मनाला भुलवी कैसे
जरी कोणी आणले चंद्र अन तारे .....
पल्याड क्षितिजा तुजे असणे
परी भासातून तुजे हसणे
वळवाचा पाऊस खुळा तो
क्षणात तुजे ते ओघळणे
ऋतू मागुनी ऋतू हे सरती
परी तुजी आठवण न सरे...............
पाऊल खुणा हि तुज्या चाहुली
अभासते मी तुजी सावली
खोल खोल डोहात गुरफटती
माज्या मनातल्या तुज्या आठवणी
ऋतू मागुनी ऋतू हे सरती
परी तुजी आठवण न सरे......
अस्मी
No comments:
Post a Comment