आठवणींचा गुंता ..............
आज बोलता बोलता माजा एक मित्र सहज बोलून गेला " आठवणीना जपण्यापेक्षा माणसाना जप ,ते जास्त सहज आणि सोप्प आहे .."
खरतर या वाक्यात किती तथ्य आहे ..म्हणजे प्रत्येकाच्या मनाला एक कप्पा असतो ..स्वताचा कप्पा ...त्या कप्प्यात न जाणो किती आठवणी जपल्या जातात ..असंख्य , अगणित ,रंगाच्या - बिनरंगाच्या, चांगल्या - वाईट ..चित्र - विचित्र ...खोल खोल आठवणींचा कप्पा ...आणि या कप्प्यात अनेक कप्पे..काही चोरकप्पे ..काही अगदी उरी जपलेले तळकप्पे ..बापरे ! हा गुंता - हे विवर किती तरी खोल आहे ..कांद्याच्या पान्तीसारखा..पातीत पाती - तश्या आठवणीत - आठवणी ..गुंतागुंत ..एक आठवण दुसर्या आठवणीला जोडलेली ..कधी चांगल्या सुरवातीपासून vaitakade जाणारी .. तर कधी वाईट तून चांगल्यात बदलणारी ...
जन्माला येण्याआधी आणि आल्यावरही " आठवणी " हा शब्द जोडला जातो ...आणि मग सुरु होतो या आठवणींचा खेळ ..पण गम्मत म्हणजे वयाच्या प्रत्येक टप्प्यात याचं स्वरूप मात्र बदलत जात ..labels लागत जातात ..एकेका कप्प्यात त्या sort होत जातात ....कधी बालपणीच्या सुखद आठवणी ..शाळेतल्या गमती जमतींच्या आठवणी .सुट्टीतल्या आजोळच्या गोड आठवणी ...कॉलेज च्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी ...तुटलेल्या रुद्याच्या आठवणी ..पहिली नोकरी .. ...बरंच काही ..सार काही पहिलं म्हणून जपलेल ..खोलवर कुठेतरी दडवून ठेवलेलं ..आणि मग त्यावर असंख्य जोडआठवणी जोडलेल्या ..आठवणी आणि मन याचं एकमेकांशी असलेल नात तरल आहे ..एकमेकांशिवाय ते अपूर्ण आहेत ..तसच आठवणी आणि स्वप्नांचं....
रोजच्या वागण्या बोलण्यात ...वावरण्यात किती तरी चेहरे नजरेसमोरून जात असतात ..आपले डोळे मन ते चेहरे टिपत असतात आणि मग काही चेहरे - आवाज आपल्या आठवणींचा भाग होऊन तो मनाच्या कप्प्यात साठवला जातो जस computerchya memory मध्ये data save होतो ..पुन्हा गुंतागुंतीची प्रक्रिया ..काय काय जपत हे मन ..पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत ..बर हे तिथेच संपत नाही तर एका श्वासापासून ते आपोआप कळत नकळत दुसर्या मनापर्यंत पोहचवत आठवणीना ...शेवटच्या श्वासात रिकामे केलेले हे कप्पे नकळतपने इतरांच्या मनाच्या कप्प्यात विखुरतात ..विसावतात..अस्तित्व ठळक करून जातात ..
" आठवणी यांची नेमकी वाख्याच मांडता येणार नाही ..आठवण ..आठव ..यांदे .. सार अनाकलनीय ..हा प्रवास ..मेंदूपासून .मनापर्यन्त्चा ...पण कधी कधी हा भार सोसवेनासा होतो मनाला ..मग त्या सार्या नको असणार्या आठवणीना खेचून बाहेर काडावस वाटत ..त्यांच्यासाठी मनाचे दरवाजे कायम बंद करून घ्यावेसे वाटत ..छळतात आठवणी मनाला ..रडवतात डोळ्यांना ..रात्र रात्र जागवतात आठवणी ..काय चुकल? कुठे? कोणाच .. याचा पिंगा घालून मेंदूचा पार भुगा करून टाकतात आठवणी ..डोळ्यांच्या ओल्या कडा आणि मनाला कड देतात या आठवणी ..तेव्हा वाटत थांबवा कोणीतरी हा खेळ ..कोर होवू दे मन ..नकोच या जीवघेण्या आठवणी ...पण येते का पुसता मनाची पाटी ...कोर करता येत का मनाला ..मग पटत कि एवड्या सार्या आठवणी जपण्यापेक्षा त्या व्यक्तीला जपा ..कडू झालेल्या मनाला निदान त्याच्या आठवणी सतत छळणार तर नाहीत ..काळाच्या ओघात ती व्यक्तीच तेवडी समोर राहील ..जीवघेण्या आठवणी नाहीत ...
पण राहू शकतो आपण आठवाशिवाय ...?...माणसाचं काय किंवा नात्याच काय ती आज आहेत ,उद्या नाहीत ..कोणालाही जीवापाड जपल तरी शाश्वत असा काहीच नाही ..हि नाती दगा देणार नाहीत ..सोडून जाणार नाहीत हे कशावरून ...त्यापेक्षा या मुक्या आठवणी बऱ्या ..सदेव सोबत असतात या ..सुखात - दुखात ..साथ करतात या ..एकटेपणात भरभक्कम आधार असतात या ..
एक गंमतीने पाहिलं तर या fast life मध्ये या अशा असंख्य आठवणी कशा जपता येतील ..मनाला - मेंदूला इतका भार देवून कस चालेल ..आणि यात वेळ घालवायला इतका वेळ आहेच कोणाकडे ? आज हाताशी असंख्य साधने आहेत संपर्काची ..कुणाचीही अगदी कधीही ..कुठल्याही प्रहरी आठवण आली कि phone , net आहेच कि हाताशी ..मग आठवणी जपा आणि झुरा कशासाठी ... मग " दूर देशी आहेस तू ..
आठवण तुजी मजकडे..डोळे आतुरले पाहायला..मन धावे तुज्याकडे..." आताच्या fast life मध्ये हि वेडी साद घालायला इतका वेळ आहे कोणाकडे ..सातासमुद्रापार असणारी व्यक्तीही स्क्रीन वर दिसते कि आपल्याला हवी तेव्हा ..२४ तास connected people आहोत कि आपण ..मग काय ..मनाचे कप्पे संकुचित होतायत आत्ता ...लिमिटेड space आणि time आहे मनाकडे .....मग एक माणूस आणि nos.. of आठवणी यापेक्षा त्या माणसालाच connected ठेवा ..मग आठवणी जपण्याचा प्रश्नच येत नाही ...but this think apart ......
आठवणी या हव्यातच ..भूतकाळात वावरायला..साथ द्यायला..हुरहुरत्या सांजेला डोळ्यांच्या कड ओलसर करायला..चंद्राची चाकोरीसारखी वाट पाह्यला.. नकळत ओंठावर आणि मनावर छानस हास्य फुलवायला..शिकताना आणि खूप सारे शिकवून देण्यासाठी आठवणी या हव्यातच ...
आठवणी म्हणजे भूतकाळातून वर्तमानाला जोडून त्यावर भविष्य उभारणाऱ्या पुलासारखा ...आणि वर्तमानातून जर्कन भूतकाळात घेवून जाणार्या
वादळ्यासारख्या ...आठवणी या हव्यातच ...
आणि त्याचं काय त्या सोबत असतातच..अगदी टाळायच्या म्हटलं तरी नाही येत टाळता ..उलट जितक दूर धावाल तितक्या त्या तुम्हाला अधिक बिलगतात..या आठवांचा मोह..ध्यास अनाकलनीय आहे ..कधी या आठवणी पाठशिवणीचा खेळ खेळतात तर कधी स्वप्नांचे भय दाखवतात आणि मग त्यातूनच गुरू ठाकूरच्या लेखणीतून उतरलेलं " एक भिगा लम्हा न जाणे कैसे छूट गया यादोन्के के बंद कमरेसे .." यासारख तरल काव्य उमटत ..त्याच्या कोंकणातल्या कित्येक आठवणींनी कोंकण विदर्भात बहरल ..आणि मग हाच कवी " आठवणींचा बसलो होतो पिंजत कापूस ..तशात पाऊस ..." अस म्हणून उगा हळव करून टाकतो ...
कवी सौमित्रच्या " क्षण एकही न ज्याला तुजी आठवण नाही ... याने जो गहिवरला नाही तो विरळा ...
अशा या आठवनिच्या सावल्या ..अंधार असो व लक्ख उजेड सतत सोबत राहतात.. रुंजी घालत ...
आणि आयुष्य समर्थपणे जगायला ..हुंदडायला ..साथ सोबत करायला आणि भूतकाळाच्या पाऊल वाटेवर उमटलेल्या पाऊलखुणा पुन्हा पुन्हा वळून पाहताना ..आठवणी या हव्याच ...
नात्याच्या मोहात नाती जपताना या आठवणी हि जपा ..यांचा ठेवा अनमोल आहे ..नात्यात अंतर येत पण आठवांत नाही ..नाती दुरावतात ..आठवणी बिलगतात ..या आपल्या आहेत ..हक्काच्या ....हक्काने ..आठवणीने जपा या आठवणी ....
अस्मी
१६.११.११
No comments:
Post a Comment