Friday 29 June 2012

तू  बरसावेस   असे  वाटते,
आवाज तुजा ऐकावा असे वाटते ,
कळले नाही मी कधीच मजला ,
तुला कळावे मी असे वाटते ....
तू वारा होऊन यावे , तू गारा होऊन यावे ,
बनुनी थेंब तू या तनमनावर सांडावेस,
तू सूर होऊन गावे असे वाटते 
तू व्हावेस श्वास माझे  असे वाटते   ..
तू  बरसावेस असे  वाटते.......
तू आरंभ , तूच सांगता होऊन यावे 
एक निशब्द सांज होऊन रेंगाळावे 
बरसत्या मल्हाराची तू धून व्हावेसे वाटते 
तू आज परतावेस  असे  वाटते .................
तू  बरसावेस   असे वाटते ....

Monday 11 June 2012



तुजी माजी ओळखही पावसाळ्यातलीच ...नुकताच बरसू लागलेला पाऊस हाहा म्हणता चांगलाच जोरदार चालू झाला होता ...मी बस ची वाट पाहात उभी होते, पावसाला मनोमन लाखोली वाहत  , चीड्चीडत ..आणि तू रस्त्यावर साचलेल्या पाण्याचं आणि खोळंबलेल्या traffic च  reporting  करत होतास , byte  साठी समोर आलास तेव्हा मी काय काय बोलले , रस्ते, traffic  , अवेळी आलेला पाऊस , ट्रेन्स  बापरे किती काय काय ...तू हसलास फ़क़्त ..आणि म्हणालास "लिफ्ट देतो" आणि पूर्ण प्रवास काहीही न  बोलता मला घरी सोडलस ..जाताना हि भरभरून हसलास ...

आणि मग आपण भेटतच गेलो ..कधी कुठल्या stop  वर , कधी CCD , कधी कुठल्या स्टेशन वर , कधी कुठल्या मिटींगला , कधी कुठे आणि कुठे ...आणि मग ..योगायोगाने घडणाऱ्या या भेटी ठरवून व्हायला लागल्या ...तास सुधा कमी पडू लागले गप्पासाठी , समाजकारण , अर्थकारण , राजकारण , सिनेमा ते अगदी sycology , media  ..कशालाही बंधन न्हवत आपल्यात ...कितेकदा वाद व्हायचे ..तू हाडाचा Reporter  ..एखादी बाजू चिरफाड करून लोकासमोर मांडणारा ..त्यातल  विदारक सत्य   नेमक बोट ठेवून बोलणारा ..आणि मी स्वप्न्याच्या दुनियेत खेळणारी ..स्वप्नांना चकचकीत बेगड लावून त्याची जाहिरात करणारी ..दोघांची क्षेत्र  वेगळी पण वाट  एकच . पण मला कौतुक होत तुज , तुज्या धडाडीच , बेदरकारपनाच  आणि तितकच तुज्यातल्या हळव्या कवीच ...मला अवघड असणारे सारे प्रश्न तुला सोप्पे वाटायचे ..माज्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुज्याकडे असायची ...सांगता आणि न सांगताही ..
आवडी निवडी जुळत गेल्या .न सांगताही कित्येक गोष्टी  उलगडत गेल्या ..तुला उशीर झाला कि मन घाबरायचं माज, तुजा आवाज नाही ऐकला  कि धाकधूक  व्हायची माजी  ..आणि मला उशीर झाला कि तू हि कावरा बावरा व्ह्यायचास ...कधी रागवायाचास ..तुज हे हक्काच रागवण .. प्रेमात पडले होते मी ..
आणि मग एका सायंकाळी थरथरत्या हाताने आणि ओलेत्या डोळ्यांनी तू माजा हात हातात घेतलास आणि म्हणालास .."माजी ट्रान्स्फर झालीय" एक क्षण मी गोंधळले , घाबरले , आणि दुसर्याच क्षणी तुज्या डोळ्यात आकाश पाहिलं मी ..जिथे तुज्या स्वप्नांना भरारी होती ..तुज आकाश तिथे होत ..तुजे ambitions , तुजे career  सार काही ..बराच वेळ माजा हात तुज्या हातात होता ..आणि निशब्द स्तब्धता ...
तू निघून गेलास ..आणि अचानक एक पोकळी निर्माण झाली .तुज्या addiction चा  त्रास व्हायला लागला मला ..नवीन शहर , नवीन संधी या सार्यात  तू busy  झालास , मी मात्र तिथेच होते ..माज जग न्हवत बदलल ..अंतर वाडत गेल ..दोन दिवसाचं बोलन चार चार दिवसांनी व्हायला लागल ..busy schedule म्हणता म्हणता आपण दूर होत गेलो ..आणि त्यातच माज्या दमाच्या आजाराने मला पार कोलमडून टाकल ..मी नखशिखांत घाबरले होते ..तुजी गरज होती मला तेव्हा ..तुज्या कुशीत  शिरून रडायचं होत मला , तू हवा होतास मला धीर द्यायला ..पण तू busy होतास तुज्या stories मध्ये ..
आणि मग  दुरावा वाडतच गेला ..अनेक समज गैरसमज होत गेले ..माज्या आजाराबद्दल तुला कधीच कळू द्यायचं न्हवत मला ..आणि याचा त्रास हि होऊन द्यायचं न्हवत तुला ..तुज्या पासून दूर जाण्याचा निर्णय माजा होता ,सर्वस्वी माजा ...
पण आज वाटत ..तू अडवायला हव होतस मला ..एकदा तरी. तुज्यावाचून अपूर्ण आहे मी ..आज माज्याकडे तुज्या आठवणी खेरीज काहीच नाहीय रे ..प्रत्येक रस्ता , प्रत्येक गल्ली , प्रत्येक क्षण तुजी आठवण देतो ..संध्याकाळ खायला उठते ..आणि रात्र वेडावून दाखवते ..या वर्षीचा पाऊस कोरडाच सुरु झाला..डोळे मात्र भिजले ...
येशील का रे परत ??? या पावसात देशील मला साथ पुन्हा नव्याने ?????????????

अस्मी 
११.०६.१२

Friday 1 June 2012






तुज्या चीवचीविणे  माजा दिवस उजाडतो ...
झोपी गेलेल्या धमन्यांमध्ये किणकिणतो तुजा आवाज ...
तू उतरतेस पापणी अल्याडच्या गर्द अंधारात ..
उबदार प्रकाशाची सोनेरी तिरीप होऊन ...
आत्ता  तू करत नाहीस झोपमोड..
आत्ता  तुज व्यसन नाही उरलं..
तू झाली आहेस माज्या असण्याचा आश्वास..
उरलेल्या लक्ख दिवसाचा लसलसता विश्वास ......
***
2011