पहाटे पहाटे जाग आली तीच मुळी पावसाच्या धुवांधार कोसळण्याच्या आवाजाने , उठून खिडकीत उभी राहिले , बाहेर मिट्ट काळोख पडला होता , पक्ष्यांची चिवचिव न्हवती ,रस्त्यावर चीट पाखरू हि दिसत न्हवत , नेहमीचा पहाटे ४ वाजता गजबजणारा रस्ता सुना पडला होता , कुठलीच हालचाल न्हवती , उजाडण्याची लक्षणे न्हवती , मी खुळ्यागत हे सार पहात होते , भान हरवल्यासारखे अंधारात काही शोधत होते ...मन झर झर मागे जात होते ..किती पावसाळे पहिले मनाशीच मेळ घालत होते ....अन मग हसूच आल एकदम , काय हे वेड्यासारखे ...पण मग वाटल जाव कि पुन्हा एकदा त्या सगळ्या पावसाळ्यात ...पहाव पुन्हा एकदा शहारून ....प्रत्येक पावसाला जाग करून .....
अजूनही आठवतो मला माजा शाळेतला पावसाळा ...नवा वर्ग, नवे दप्तर , नवा कोरा युनिफोर्म , नवे मित्र - मैत्रिणी , आणि नवा पावसाळा , नव्या कोर्या पुस्तकांच्या गंधात ह्या पावसाळ्याचा गंध जणू मिसळलेला ..किती काळजीने आईने रिक्षात बसवलं होत , दाटीवाटीने ओल्या रेनकोट ने एकमेकांना ढोसत आम्ही शाळेत निघालो होतो , काय मज्जा होती नाही ..त्यातही मला पहायचं होत रस्त्यात साचलेल्या पाण्यातून रिक्षा गेल्यावर उडणारे पाण्याचे फवारे ...आणि मग रिक्श्वल्या काकांचा ओरडा ..अरे नीट बसा रे ..कशाला वाकून pahtaay , नेहमीच येतो हा पावसाळा ..तरीही उतुस्क्ता पावसाची ..........
घरी आल्यावर आईने पुसलेले केस आणि गरम गरम हळदीच दुध ..त्या गाल्लेरीतल्या तळहातावर झेललेया सरी..इवलीशी छत्री घेऊन आईच्या पाठी पाठी चालणारी मी ..सारे एकत्र येऊन बिल्डींगच्या खाली साचलेल्या पाण्यात सोडलेल्या होड्या . आणि तुजी -कि माजी ची अहमिका... सार आठवत ..अगदी पावसात भिजल्यामुळे आईचा खालेल्ला धपाटाहि .....
आणि त्या नंतर आला पावसाळा तोच मुळी गुलाबी शहारा घेऊन , कॉलेज मधला पहिला पावसाळा म्हणून जरा अमळ कौतुकच , नवे कॉलेज , नवा साज , थोडी भीती आणि खूप सार tention , पहिल्यांदाच केलेला एकटीने ट्रेनचा प्रवास , आणि सोबतीला पाऊस ..माजा पाऊस ..आणि मग जशी मी कॉलेज मध्ये रमत गेले तसा हा ५ वर्षांचा पावसाळा अधिकच गहिरा होत गेला ..किती सार्या आठवणी मनाच्या कप्प्यात दडवून ठेवल्या ..चिंब चिंब ...पहिला क्रश , त्याने भर पावसात दिलेली घरापर्यन्त्ची लिफ्ट, वाटेत थांबून घेतलेली गरम गरम कॉफ्फी, त्याचा गंध आजही मनात आहे ...त्या दिवसात किती मोगर्याची रोपे लावली असतील मी , किती कविता केल्या असतील , उगाच कितीदा त्याची वाट पाहत बस stop वर पावसात भिजले असेन मी ..आत्ता सार सार आठवून हसायलाच येत .....
तो वेडा होता पाऊसखुळा
अन मीही नाद्खूळी
असेच नाते पावसाशी या
आठवणी मनात दडलेल्या ....
कॉलेज संपल आणि खर सांगू तो पावसातला निरागसपणाहि संपला ...आता हा सुंदर , निरागस पावसाळा फ़क़्त सुट्टीच्या दिवसात आवडू लागला ..एरव्ही नकोसा वाटायला लागला..किती चिखल, गर्दी, ते ओले कपडे..शी.. आणि वैताग म्हणजे रोज होणारा लेट , आणि लागणारा लेटमार्क , अगदी ट्रेन मध्ये विंडो सीट मिळाली तरीही त्या पावसाच कौतुक करण्यापेक्षा घड्याळाकडे लक्ष जास्त आणि वर बिचार्या पावसाला तड तड बोलन , जणू काही हाच लावतो लेटमार्क ..मग अशा पावसात खरेदीही नको आणि घराबाहेर फिरनही नको ...पण आवडतो बुवा हा पावसाळा.. जेव्हा रेनी पिकनिक असते , तो एकच दिवस जणू अक्खा पावसाळा प्यायला मिळतो , सुखाने ..निवांत ....
किती रूपे या पावसाची , किती आठवणी या पावसाच्या ,, सोबतीला नकोसा वाटणारा आणि दरवेळेस वाट पाह्यला लावणारा ..कधी रिमजिम..कधी धडाम-धूम..कधी संथ. कधी रोद्र रूप, पावसाचे नखरे ..तर कधी करवून घेतलेले लाड ...त्याने दिलेली भजी आणि चहाची खास भेट ..वा .. या पावसाच सारच नीराळ...असा हा पाऊस बघता बघता किती वेळ गेला कळलच नाही ...आणि मग घड्याळाकडे लक्ष गेल ..अरे बापरे !...चांगलाच उशीर झाला होता ..आता रस्ता हि गजबजला होता ..आत्ता मात्र पळयला हव..उगाच या पावसामुळे लेटमार्क व्ह्याचा ......
अस्मी
२७.०८.११
No comments:
Post a Comment