चौकटीतल्या या नात्यांच्या तू राजा अन मी राणी
रोजचेच ते अपुले जगणे , रोजचीच ती वाणी
गीत कसे मांडावे अपुले त्याच त्यच शब्दांनी
चौकटीतल्या या नात्यांच्या तू राजा अन मी राणी ....
हात दिला हाती तुजीया संसाराच्या या वळणी
पसाऱ्यात पण त्याच्या उरल्या केवळ आठवणी
हाती केवळ तडजोडी ,उगा वेडावतो हा चंद्र नभी
चौकटीतल्या या नात्यांच्या तू राजा अन मी राणी ......
अस्मी
No comments:
Post a Comment