रोज सकाळी उठल्यावर एक दीर्घ श्वास घेऊन तुज्या हसऱ्या आठवणी श्वासात गच्च भरून घेते मी ..मग त्याच पुरवते दिवसभर कशाबश्या ! रात्री मात्र पुन्हा सकाळची धास्ती .......किती दिवस पुरतील या आठवणी ???? मनही हल्ली नव्या आठवणी मागतोय ..पण तू वाऱ्यासारखा आलास आणि गेलास ..त्या वावटळीत जेमतेम वेचता आल्या तितक्याच आठवणी साठवणी झाल्या ...पण मनाला कोण आणि कस समजावणार , कि वाहून गेलेला वारा उलट कधी वाहत नाही !
पण तरी एक वेडी आशा..वाहशील कधी उलट पुन्हा एकदा ...तुज्यासाठी आतुरलेल्या मनासाठी माज्या ?????
02.08.12
This comment has been removed by the author.
ReplyDeleteकाही गोष्टी आयुष्यात पुन्हा येत नाहीत...जसा स्पर्शून गेलेला वारा येत नाहीत तशा..
ReplyDeleteपण प्रत्येक वळणावर नवा वारा येत असतो..नवा गंध, नवीन चैत्यन्य घेऊन..
पण काही आठवणींचा गंध आयुष्यभर दरवळत असतोच... तेच समाधान
आपल्या मनाला खूप वाटतं.. पण ते आपल्या मनाला वाटतं.. त्याच्या/तिच्या नाही..हाच फरक आहे
ani ha na padnara farakach jast kevilvana asto ... sparshun gelela vara punha yet nahi ..manya ..pan tasa shahara punha yet nahi ... : )
ReplyDeleteतोच शहारा नसेलही..परंतु नवीन वा-याच्या स्पर्शाचा शहारा हा अधिक रोमांचित करणारा असू शकतो..ते स्वीकारण्याची मनाची तयारी हवी
ReplyDelete