एक बासूरीवाला........
एक शांत सायंकाळ ....अस्ताला जाणारा सूर्य , त्याच्या धूसर होत चाललेल्या वाटा , अंगाला झोंबणारा गार वारा ........
अशा शांत एकाकी सायंकाळी त्याचा माजा एकांत ....मनात चाललेली चलबिचल ....
माजे डोळे आपसूक बंद झाले होते ....आणि सूर ऐकू आला , त्याच्या बासरीचा .....
अलवार त्याने बासरी ओठाला लावली आणि तो त्याच्याही नकळत सूर छेडू लागला ...
एक क्षण सारा आसमंत त्या धुंदीने बहरला ...त्याचा हर एक सूर मनात उतरत होता , देहात भिनत होता ....
त्याची तन्मयता त्याच्या सुरात उतरत होती आणि मी भान हरपून गेले होते...
आज मी त्याच्याही आणि माज्याही नकळत त्याच्या जवळ आले होते ......अनाहूतपणे .........
एका अनाहूत , मंत्रमुग्ध प्रवासाची सुरवात झाली होती .....
२१.१०.१२
त्याच्या बासरीचे सूर मंत्र मुग्ध करणारे होते...
ReplyDeleteपण असे मंत्र मुग्ध करणारे सूर नेहमीच निघत नाही...
असे सूर कुणासाठी तरी निघावे लागतात..
समोर निसर्गाची अप्रतिम कलाकृती असावी लागते..