Friday 30 November 2012

वादळ अन तु !!!!


वादळ अन तु !!!!


काल एक वादळ उठल होत , अचानक ...माझ ओळींन लावलेलं अंगण पार विस्कटून गेल अरे . त्या वादळाने जणू त्या अंगणाच्या अस्तित्वालाच धक्का दिला ..मन भरून आल...मला क्षणभर वाटल तूच आलास ..कारण वादळ आणि तू यात बरच साम्य आहे .
आहेच अरे ! तोही एक झंझावात अन तुही !!!!
अनिश्चित , झन्झावती , बेदरकार ...तुही असाच आला होतास अचानक . माज्या शांत आयुष्यात असच वादळ उठवलस , , मन सैरभर करून गेलास , पण जाताना माझ आखलेलं आयुष्य मात्र दिशाहीन करून गेलास ...
अंगणाच काय रे ते पुन्हा आवरता ही येईल , पण मनाच काय करू ? त्याला कस आवरू ? तुज्या जाण्याने पार विस्कटून गेलय ते, मन भर तुज्या आठवांचा पालापाचोळा , तुज्या स्पर्शाचा सैरभर गंध ...नाही पेलवता आला मला तुझा झंझावात ...तुझा बेदरकारपणा .....
म्हणूनच म्हटलं ' वादळ आणि तुज्यात " बरच साम्य आहे ................
अस्मी
30.11.12

1 comment:

  1. वादळ येऊन गेलं की त्याच्या अस्तित्वाच्या खुणा राहतातच..निसर्ग नियम आहे तो.. पण वादळांना तोंड द्यायचं असतं.. आयुष्यात अनेक वादळं येत असतात...वादळातून स्वताला सावरणं कसोटी असते..

    ReplyDelete