Monday, 10 December 2012

विसरेन मी तुला ..





विसरेन मी तुला ..अस म्हणत किती दिवस सरून गेले .. ती व्यक्ति आजुबाजुला असुनही नसल्या सारखीच ..इतकी परकी की कधी आपण प्रेम केल याचच आच्छर्य वाटाव. मला याच नवल वाटत, एखादी आपल्याला आवडनारी व्यक्ति आपल्या आयुष्यात यावी म्हणून आपण काय करत नाही , किती शक्कल अणि किती बहाने ..सार काही त्या व्यक्तीसाठी असत , वेळ नसूनही तो काढला जातो , छोट्या छोट्या गोष्टी imp ठरतात ..आपल सार काही तीच होउन जाते ..ती व्यक्ति हवीहवीशी वाटत राहते , सगळी सुखदुख शेयर नाही झाली तर चैन पडत नाही , दिवसभराची विश्रांति ठरते ती ...नाही बोललो आपण की बैचेन व्ह्यायला होत , अशी ही व्यक्ति आपल आयुष्य बनून जाते ..अणि मग एक दिवस ब्रेक अप होत अणि हीच व्यक्ति क्षणात परकी होऊन जाते ...इतकी की तिचा आवाजही सहन नाही करू शकत आपण ..मग ते प्रेम ,ती भावना ,ते sharing कस विसरलं जाऊ शकत ? इतक एखाद्याशी नात तोड़ता येत ..टोकाची भूमिका घेता येते ? एक नात जुळल नाही तर मैत्रीच नात नाही रहू शकत का ? या नात्यांच्या गुंतागुंतीच सारच अनाकलनीय ...एखाद्याला पूर्ण समजूनही आपण नाही समजू शकत हेच खर सत्य .....

 ***
 

1 comment:

  1. प्रेमाच्या नात्यानंतर मैत्रीचं नातं राहू शकत नाही. असं नातं पुन्हा जोडायचा प्रयत्न केला तर फक्त औपचारीकता शिल्लक राहते आणि ती अधिक त्रासदायक ठरते.
    नात्याला पूर्ण विराम मिळाल्यानंतर मन अस्वस्थ होतं.. मनाच्या वेदना सहन कराव्या लागतात..इलाज नसतो.. पण, एका ठराविक काळा पुरत्याच.. आपला प्रवास सुरु राहतो...नवीन वळणावर, नवीन सोबतीने...मग भूतकाळातील आपल्या वेडेपणावर आपल्यालाच आश्चर्य वाटत रहातं

    ReplyDelete