कधी कधी असे हि घडते ..जी व्यक्ती जवळ असते तेव्हा तिच्याशी काय बोलायचे हा प्रश्न पडतो आणि तीच व्यक्ती दूर गेल्यावर तिच्याशिवाय काय बोलायचे हा प्रश्न पडतो ..ती जवळ असताना तिला द्यायला पुरेसा वेळच नसतो आणि तिची जागा रिकामी जाल्यावर फावला वेळ खायला उठतो ...ती असते तेव्हा तिचा फोन कामाच्या व्यापात नाही उचलता येत किंबहुना नंतर बोलू म्हणून तो तसाच वाजत राहतो ..आणि जेव्हा ती कायमची दूर जाते तेव्हा कधीतरी तिचा फोन येईल म्हणून तासंतास त्या फोन कडे डोळे लागून राहतात ....ती असते तेव्हा उगाच झोपही लवकर येते आणि नसते तेव्हा रात्र रात्र जागीच राहते ...तिला आयुष्याचा भाग म्हणून गृहीत धरलं जात ..तीच मन दुखावलं जातंय असा पुसटसा विचारही मनात येत नाही ..अशाच समज गैरसमजातून तीच व्यक्ती दूर झाल्यावर मात्र आपण एकाकी उरलोय याची जाणीव प्रत्येक क्षणाला होत राहते ..आणि तेव्हा हातात काहीच उरलेलं नसत ..तिच्या आठवांशिवाय !!!!
आयुष्याच्या वळणावर कित्येक सुंदर वळणे येतात , त्यांना जपून ठेवा ,कदाचित त्यातलच एखाद वळण तुमच आयुष्य बदलेल .........
Thursday, 13 December 2012
कधी कधी असे हि घडते ..जी व्यक्ती जवळ असते तेव्हा तिच्याशी काय बोलायचे हा प्रश्न पडतो आणि तीच व्यक्ती दूर गेल्यावर तिच्याशिवाय काय बोलायचे हा प्रश्न पडतो ..ती जवळ असताना तिला द्यायला पुरेसा वेळच नसतो आणि तिची जागा रिकामी जाल्यावर फावला वेळ खायला उठतो ...ती असते तेव्हा तिचा फोन कामाच्या व्यापात नाही उचलता येत किंबहुना नंतर बोलू म्हणून तो तसाच वाजत राहतो ..आणि जेव्हा ती कायमची दूर जाते तेव्हा कधीतरी तिचा फोन येईल म्हणून तासंतास त्या फोन कडे डोळे लागून राहतात ....ती असते तेव्हा उगाच झोपही लवकर येते आणि नसते तेव्हा रात्र रात्र जागीच राहते ...तिला आयुष्याचा भाग म्हणून गृहीत धरलं जात ..तीच मन दुखावलं जातंय असा पुसटसा विचारही मनात येत नाही ..अशाच समज गैरसमजातून तीच व्यक्ती दूर झाल्यावर मात्र आपण एकाकी उरलोय याची जाणीव प्रत्येक क्षणाला होत राहते ..आणि तेव्हा हातात काहीच उरलेलं नसत ..तिच्या आठवांशिवाय !!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
जे जे जवळ असते त्याची किमत कोणाला कळत नाही.. ती मग एखादी वस्तू असो व नाते. फार कमी जण याला अपवाद असतात.. पण आता जे हातात आहे त्याला गमावू नये.. जे आहे त्याची किमत ओळखावी.. अर्ध्या वाटेवर सोडून गेलेल्यांची आठवण अधिक सलत असते.. गेलेले क्षण परत येणार नाही हे सत्य स्वीकारायलाच हवं...
ReplyDelete