Wednesday, 12 December 2012

गारुड ...



***
न कळता गुज मनातले उमजून जाते ..
तुज्या शब्दांचे गारुड असले कि मन थिजवून जाते ..
अंधारले क्षितीज तरी मन उजळून जाते
सुरात तुज्या मग मी हरवून जाते ....
तू नीळा सावळा मेघ घननिळा ..
तू इंद्रधनुचा मुघ्ध पिसारा..
तू शहराल्या रातीचा गारवा ..
तू झिनझिन नारा सूर मारवा ...
नादात तुज्या नकळत मी हरवून जाते ....
कधी असे कधी तसे मलाच न कळते ..
तू स्वैर सरींचा पाऊस वेडा ..
तू भासांचा भास खुळा ..
न कळता गुज मनातले उमजून जाते ..
तुज्या शब्दांचे गारुड असले कि मन थिजवून जाते ..
 
 

1 comment:

  1. होय, शब्दांचे गारुड मन थिजवते...शब्दात आपलेपणा असतो..ताकद असते.. सुंदर! भावना चांगल्या पद्धतीने मांडल्या आहेत..

    ReplyDelete