Thursday, 20 December 2012



काल ऑफिस मधून निघताना उशीर झाला ..बाहेर तुरळक वर्दळ होती ...शेवटची ट्रेन ..मोजून १०- १२ लेडीज ..एरव्ही कधी भीती नाही वाटली प्रवास करताना ..पण काल कुठेतरी भीती वाटत होती, घरी निट पोहचेन कि नाही याची ...खर सांगू ..अशा वेळेस तूझी खूप आठवण झाली ..वाटल तुला फोन करावा..तुझा आवाज ऐकावा ..तुज्या आवाजाने नेहमी धीर यायचा मला ...मला उशीर झाला कि मी सुखरूप पोहचेपर्यंत तू सतत संपर्कात असायचास ...एकही मिनिट मला एकट वाटायचं नाही ..call ,sms , bbm , FB ..सतत ......तू बरोबर नसलास तरी एक आधार वाटायचा मला ....तू रागवायचास हि खूप उशीर होतो म्हणून ...पण काळजी हि तितकीच घ्यायचास !!!
काल मात्र खूप एकट पडल्यासारखं वाटल , अनाहूतपणे नजर सतत mobile वर जायची , वाटायचं चुकून तरी तुझा एखादा call,sms येईल , खूप भरून येत होत ...आणि खर सांगू ..आजूबाजूच्या भीतीपेक्षा मी एकटी पडलेय याचीच भीती जास्त वाटत होती मला .. कशीबशी घरी पोहचल्यावर न जेवताच झोपले ...मन आणि मेंदू दोन्ही थकले होते ..पण जेवून घे अस हक्काने सांगायला हि तू न्हवतास ...
एक मात्र नक्की जाणवलं या पुढचा चा प्रवास माझा असेल , एकटीचा ..कितीही भीती वाटली तरी ........ bt i always miss u ....always ......
***
२०.१२.१२

Wednesday, 19 December 2012

 
 
 
* . 2 )
 
ख्वाब हो ..खयाल हो ...
या हो कोई आंधी ...
धूप हो छाव हो ...
या हो कोई पहेली .........
जब भी आता  हैं खयाल
हम थमसे जाते हैं ..
राह में चलते चलते
युंही रुक से जाते हैं ..
ना देखा हैं रंग ..
ना रूप हैं देखा ...
देखा हैं खयालोमे
उभरता एक चेहरा अन्जानासा ...
एक बार मिलो हमसे
कुछ सवाल हैं अनकहेसे ..
जवाब मिले न मिले ..
हम सांस तो लेंगे सुकुनसे .....
ख्वाब हो ..खयाल हो ...
या हो कोई आंधी ...
धूप हो छाव हो ...
या हो कोई पहेली .........
अस्मी
***

Thursday, 13 December 2012





कधी कधी असे हि घडते ..जी व्यक्ती जवळ असते तेव्हा तिच्याशी काय बोलायचे हा प्रश्न पडतो आणि तीच व्यक्ती दूर गेल्यावर तिच्याशिवाय काय बोलायचे हा प्रश्न पडतो ..ती जवळ असताना तिला द्यायला पुरेसा वेळच नसतो आणि तिची जागा रिकामी जाल्यावर फावला वेळ खायला उठतो ...ती असते तेव्हा तिचा फोन कामाच्या व्यापात नाही उचलता येत किंबहुना नंतर बोलू म्हणून तो तसाच वाजत राहतो ..आणि जेव्हा ती कायमची दूर जाते तेव्हा कधीतरी तिचा फोन येईल म्हणून तासंतास त्या फोन कडे डोळे लागून राहतात ....ती असते तेव्हा उगाच झोपही लवकर येते आणि नसते तेव्हा रात्र रात्र जागीच राहते ...तिला आयुष्याचा भाग म्हणून गृहीत धरलं जात ..तीच मन दुखावलं जातंय असा पुसटसा विचारही मनात येत नाही ..अशाच समज गैरसमजातून तीच व्यक्ती दूर झाल्यावर मात्र आपण एकाकी उरलोय याची जाणीव प्रत्येक क्षणाला होत राहते ..आणि तेव्हा हातात काहीच उरलेलं नसत ..तिच्या आठवांशिवाय !!!!

Wednesday, 12 December 2012

गारुड ...



***
न कळता गुज मनातले उमजून जाते ..
तुज्या शब्दांचे गारुड असले कि मन थिजवून जाते ..
अंधारले क्षितीज तरी मन उजळून जाते
सुरात तुज्या मग मी हरवून जाते ....
तू नीळा सावळा मेघ घननिळा ..
तू इंद्रधनुचा मुघ्ध पिसारा..
तू शहराल्या रातीचा गारवा ..
तू झिनझिन नारा सूर मारवा ...
नादात तुज्या नकळत मी हरवून जाते ....
कधी असे कधी तसे मलाच न कळते ..
तू स्वैर सरींचा पाऊस वेडा ..
तू भासांचा भास खुळा ..
न कळता गुज मनातले उमजून जाते ..
तुज्या शब्दांचे गारुड असले कि मन थिजवून जाते ..
 
 

स्वप्नवेडी ........




 
 
 
 
 
 


 
 
 

 
वादळाची वाट ती , वाऱ्याची साद ही
गुंतल्या रातीची ..गुंतलेली विन ही
उधळून सारे श्वास ती , मिटूनि ही पापणी
काळजाला चिरते ती ...
एक ही स्वप्न वेडी ...स्वप्नवेडी ........
वादळाची वाट ती ..वाऱ्याची साद ही ........१
 
सोडिले केव्हाच मागे, हे सगे अन सोयरे ही ..
उरात उरली रिक्तता अन ओली स्पंदने ही ..
काचेच्या वाटेवरी चालली ही एकटी ..
घूसमटलेली सावली ही ...
एक ही स्वप्नवेडी ..स्वप्न वेडी ...
वादळाची वाट ती ..वाऱ्याची साद ही २
 
शून्य ती , एक ध्यास ती
अवघडलेला श्वास ती ,
भोवतालच्या जंगली
निष्पाप ती , बावरी ती ,
एक ही स्वप्नवेडी ..स्वप्न वेडी
वादळाची वाट ती ..वाऱ्याची साद ही .. ३
....................
*** 
12.12.12

Tuesday, 11 December 2012

कोल्याची पोर मी ..

 
 


कोल्याची पोर मी ..चंद्राची कोर ..
कुणाच्या हाताला लागायची नाय ..
वारा हु मैं ..बिजली हु मैं
चंद्राची चमचम चमचम चांदी हु मैं...
छलकता हुंआ एक जाम हाय ..
तुज्याबी ओठाला लागायची नाय ...
कोल्याची पोर मी ..चंद्राची कोर ..
कुणाच्या हाताला लागायची नाय ..................
झिंगरी हु मैं , भिंगरी हु मैं ..
अदा हु मैं, नशा हु मैं ..
गर गर तुलाबी फिरवून जाय ...
तुज्या जाल्यात अशी मी गावायची नाय ..
कोल्याची पोर मी ..चंद्राची कोर ..
कुणाच्या हाताला लागायची नाय ..
अस्मी
११.१२.१२

Monday, 10 December 2012

विसरेन मी तुला ..





विसरेन मी तुला ..अस म्हणत किती दिवस सरून गेले .. ती व्यक्ति आजुबाजुला असुनही नसल्या सारखीच ..इतकी परकी की कधी आपण प्रेम केल याचच आच्छर्य वाटाव. मला याच नवल वाटत, एखादी आपल्याला आवडनारी व्यक्ति आपल्या आयुष्यात यावी म्हणून आपण काय करत नाही , किती शक्कल अणि किती बहाने ..सार काही त्या व्यक्तीसाठी असत , वेळ नसूनही तो काढला जातो , छोट्या छोट्या गोष्टी imp ठरतात ..आपल सार काही तीच होउन जाते ..ती व्यक्ति हवीहवीशी वाटत राहते , सगळी सुखदुख शेयर नाही झाली तर चैन पडत नाही , दिवसभराची विश्रांति ठरते ती ...नाही बोललो आपण की बैचेन व्ह्यायला होत , अशी ही व्यक्ति आपल आयुष्य बनून जाते ..अणि मग एक दिवस ब्रेक अप होत अणि हीच व्यक्ति क्षणात परकी होऊन जाते ...इतकी की तिचा आवाजही सहन नाही करू शकत आपण ..मग ते प्रेम ,ती भावना ,ते sharing कस विसरलं जाऊ शकत ? इतक एखाद्याशी नात तोड़ता येत ..टोकाची भूमिका घेता येते ? एक नात जुळल नाही तर मैत्रीच नात नाही रहू शकत का ? या नात्यांच्या गुंतागुंतीच सारच अनाकलनीय ...एखाद्याला पूर्ण समजूनही आपण नाही समजू शकत हेच खर सत्य .....

 ***
 

एक बासूरीवाला........


एक बासूरीवाला........
 
 
 
एक शांत सायंकाळ ....अस्ताला जाणारा सूर्य , त्याच्या धूसर होत चाललेल्या वाटा , अंगाला झोंबणारा गार वारा ........
अशा शांत एकाकी सायंकाळी त्याचा माजा एकांत ....मनात चाललेली चलबिचल ....
माजे डोळे आपसूक बंद झाले होते ....आणि सूर ऐकू आला , त्याच्या बासरीचा .....
अलवार त्याने बासरी ओठाला लावली आणि तो त्याच्याही नकळत सूर छेडू लागला ...
एक क्षण सारा आसमंत त्या धुंदीने बहरला ...त्याचा हर एक सूर मनात उतरत होता , देहात भिनत होता ....
त्याची तन्मयता त्याच्या सुरात उतरत होती आणि मी भान हरपून गेले होते...
आज मी त्याच्याही आणि माज्याही नकळत त्याच्या जवळ आले होते ......अनाहूतपणे .........
एका अनाहूत , मंत्रमुग्ध प्रवासाची सुरवात झाली होती .....
२१.१०.१२

Tuesday, 4 December 2012

Chalo Accha Hua ...




एक उम्मीद थी तो इंतजार था ..
इंतजार था क्योंकी उम्मीद थी ..

कल उम्मीद के साथ साथ इंतजार भी मिट गया ...........
चलो अच्छा हुंआ आपने दोनो को मिटा दिया !
पर ये माना जो गया वोह ना लौटा ..
न चैन पाया , ना सुकून पाया ..
उठे सवालोन्के साथ साथ जवाब भी मिट गया ...........
चलो अच्छा हुंआ आपने दोनो को मिटा दिया !
पाने कि आस थी , प्यार कि प्यास थी ..
आपका वजूद जिने कि वजाह थी ..
वजूद के साथ साथ मेरा दिल भी बूज गया ..
चलो अच्छा हुंआ आपने दोनो को मिटा दिया !
०४.१२.१२

Sunday, 2 December 2012

आतुरलेल्या मनासाठी माज्या ...y





रोज सकाळी उठल्यावर एक दीर्घ श्वास घेऊन तुज्या हसऱ्या आठवणी श्वासात गच्च भरून घेते मी ..मग त्याच पुरवते दिवसभर कशाबश्या ! रात्री मात्र पुन्हा सकाळची धास्ती .......किती दिवस पुरतील या आठवणी ???? मनही हल्ली नव्या आठवणी मागतोय ..पण तू वाऱ्यासारखा आलास आणि गेलास ..त्या वावटळीत जेमतेम वेचता आल्या तितक्याच आठवणी साठवणी झाल्या ...पण मनाला कोण आणि कस समजावणार , कि वाहून गेलेला वारा उलट कधी वाहत नाही !
पण तरी एक वेडी आशा..वाहशील कधी उलट पुन्हा एकदा ...तुज्यासाठी आतुरलेल्या मनासाठी माज्या ?????


02.08.12