तू भेटलास पुन्हा नव्याने......
तू भेटलास पुन्हा एकदा नव्याने
धूसर झालेल्या त्याच ओलेत्या वाटेने
क्षण क्षण सारे त्यात पुन्हा विरून गेले
श्वास काही सुटलेले पुन्हा गेले वेचले ..
तू भेटलास पुन्हा एकदा नव्याने......
तोच होता चेहरा तुझा अन तेच होते डोळे
पण हसू नव्हते नेहमीचे ,न्हवते ओळखीचे,
भाव होते डोळ्यातले तेच कधी पूर्वीचे..
पण दिसले नाही मलाच प्रतिबिंब माझे ..
तू भेटलास पुन्हा एकदा नव्याने......
तू होतास सोबत माझ्या पण मन पाखरू झाले होते..
स्पर्शाचे ही अपुल्या अंतर वाढले होते..
होतास कधी तू माझा पण काही जाणवले होते..
तुझे माझे पुढचे रस्ते आता वेगळे होते...
तू भेटलास पुन्हा एकदा नव्याने......
पुन्हा हरवण्यासाठी ............
- अस्मि
२२.०३.2011
No comments:
Post a Comment