मी माझी चालत होते रस्त्याने …धावत होते माज्या परीने , विश्व होत माझ … तू अचानकच भेटलास , आणि मग भेटतच गेलास, तुझा वेग माज्यापेक्षा जास्तच होता , तरीही तू थांबलास माज्यासाठी , म्हणालास चालूया एकत्र , बघूया वेगाशी वेग जुळवून . कित्पत जमतंय … मला खात्री न्हव्तीच , पण तुझा आग्रह नाही मोडवला …म्हणालास एकाच ठिकाणी पोहचायचं आपल्याला आत्ता , मग मार्ग का वेगळे …तुज् पटलं मला … निशंक मनाने तुज्या हातात हात दिला . तुज्या वेगाशी वेग साधण्याचा आटोकाट प्रयत्नही केला , पण खर सांगू या सगळ्यात फरफट झाली .. माजी , माज्या मनाची, माज्या स्वप्नांची , आणि मी साधलेल्या ध्येयाची …. तू होतास तिथेच होतास , त्याच वेगाने धावत … आणि एकदा अचानक हात सुटला … तुज्या दौडीत तुज्या ते लक्षातही नाही आल… मी खूप हाका मारल्या तुला … पण तू वारा … सुसाट होतास …. मी मात्र भरकटले … दिशाहीन …. खूप वाट पाहिली …तु फिरला नाहीस मागे, अशक्यच होत म्हणा तुला तुज वेग कमी करण आणि उलट फिरन हि , अशक्य होत मला तुज्या वेगाशी पुन्हा माझा वेग जुळवण … पण एक मात्र झाल …आयुष्याचा वेग मात्र वाढला , मीही धावतेय आत्ता , पण वेगळा आहे रस्ता आपला , हो ना ????
No comments:
Post a Comment