Friday, 30 November 2012

वादळ अन तु !!!!


वादळ अन तु !!!!


काल एक वादळ उठल होत , अचानक ...माझ ओळींन लावलेलं अंगण पार विस्कटून गेल अरे . त्या वादळाने जणू त्या अंगणाच्या अस्तित्वालाच धक्का दिला ..मन भरून आल...मला क्षणभर वाटल तूच आलास ..कारण वादळ आणि तू यात बरच साम्य आहे .
आहेच अरे ! तोही एक झंझावात अन तुही !!!!
अनिश्चित , झन्झावती , बेदरकार ...तुही असाच आला होतास अचानक . माज्या शांत आयुष्यात असच वादळ उठवलस , , मन सैरभर करून गेलास , पण जाताना माझ आखलेलं आयुष्य मात्र दिशाहीन करून गेलास ...
अंगणाच काय रे ते पुन्हा आवरता ही येईल , पण मनाच काय करू ? त्याला कस आवरू ? तुज्या जाण्याने पार विस्कटून गेलय ते, मन भर तुज्या आठवांचा पालापाचोळा , तुज्या स्पर्शाचा सैरभर गंध ...नाही पेलवता आला मला तुझा झंझावात ...तुझा बेदरकारपणा .....
म्हणूनच म्हटलं ' वादळ आणि तुज्यात " बरच साम्य आहे ................
अस्मी
30.11.12

Love & Technology : (




फेसबुकवर ओळख झाली ...
chat वर झाल्या गप्पा
देवाण घेवाण नमबरांची
हा झाला पहिला टप्पा ....
black berry ने कमालच केली
सहवासाची २४ तास हमी
कधी पडले प्रेमात
दोघानाही कळलेच नाही....
BBM वरच propose केल
picture ने रेड rose send केल
तिनेही file ने accept केल
हे नात असा BBM वरच जुळून आल.....
मग FB वरच romance आणि
BBM वरच भांडण
दूर देशी असला तरी
त्याच तीच अस मिलन ....
मग समज गैरसमजांच वादळ अंतर
आत्ता आत्ता करता नाहीच आला नंतर
मग BBM वरच अखेरच बोलन
आणि अखेरचा निरोप
तुटल, संपल सार
हाती काहीच ना उरल ...
अशी होती कहाणी त्यांची
Technology ने सुरु झाली
आणि Technology नेच संपली ..
asmi ....

तुज्यासाठी ..............

तुज्यासाठी ,


हल्ली काही तरी वेगळच घडतंय माज्यासोबत ..अरे, आधी तुजी आठवण आली कि डोळ्यात टचकन पाणी यायचं , रडून रडून डोळे सुन्न व्हायचे ,तुज्या कित्येक आठवणी रडवून जायच्या , जिथे जिथे आपण भेटायचो त्या जागा अधिकच रडवून जायच्या , पण आत्ताशा तुज्या आठवणी एक हलकस हसू घेऊन येतात , तुज्याबरोबर घालवलेला हर एक क्षण सुंदर होता , प्रसन्न होता , त्याच आठवणींनी आताशा खूप फ्रेश वाटायला लागलंय मला , त्या जागांकडे बघून आत्ता रडू नाही येत ,तिथे घालवलेला प्रत्येक क्षण न क्षण आठवतो ..आणि एक छानस हसू मात्र येत ...तुज्याबरोबर जगलेला तो प्रत्येक क्षण मला पुन्हा खुणावतो , पुन्हा नवी प्रेरणा देतो ..तुज नसण स्वीकारलंय मनाने ...तरी पुन्हा जगावस वाटतंय आत्ता तसच प्रसन्न ....जसं तू प्रत्येक क्षण माज्यासोबतच आहेस ..तू नसतानाही तू असण्याचा भास घेऊन तुज्या आठवात !!!!

Asmi
01..12.2012
Asahi ghadat kadhi kadhi ....
Asahi ghadat ..kadhi kadhi ...navin chehryanchya jagmagatat june chehre dhusar hot jatat , kityke junya jahkmanvar gairsamjanchi khapali chadat jate . kalachya pravahat apla veg ani disha apanach badlun takto..junya pravahachya virudh ...bhutkal javal javal visrlyatach jama hot jato ..apan sthiravaloy yach bhranat divas nighun jatat ..ani achanak vatevar ek vadal yet , mothya mushkiline kalachi bandhleli bhint pattyansarkhi koslun jate .dolyat swapnbhangachi dhul udate ani mag oghalnarya ashruni dole swach jhale ki toch juna chehra disu lagato . tasach shant , samjutdar aaj hi ..tyachya dolyat prem gavasat ..tech niragas ...khup kahi gamavun punha achanak gavsalyacha anand !!!!! asahi ghadat kadhi kadhi ............