Tuesday, 21 January 2014

मी नेहमीच तुला शोधण्याचा प्रयत्न करत आलेय, करतेय ...तू जवळ होतास तेव्हा हा शोध प्रकर्षाने नाही घ्यावासा वाटला ..अवकाश आहे अजून असच वाटत आल मला , आधी स्वताला तर शोधू तुज्यात म्हणून स्वतालाच बंदिस्त करत गेले तुज्यात ..आणि तुझा शोध घ्यायच राहूनच गेल..तुज्यात मला शोधता शोधता तू निघुनही गेलास ..वितळून गेलास आणि मी शोधत राहिले अजूनही ....गेले कित्येक दिवस ..कित्येक महीने , कित्येक तास , कित्येक सेकंद..तिन्ही प्रहर!!!
मग कुठूनसा वारा येतो..तुजी अंधुकशी बातमी घेउन ..तुज्या मनातली घालमेल, ते काहूर उमटत कुठेतरी ..तुज्यापर्यंत पोहचण्याचा धीर होत नाही पण या काहुरीचा शोध घ्यावासा मात्र वाटत रहात . पुन्हा तुला शोधण्याचा फिकटसा प्रयत्न चालू होतो ..तू दूरवर ..भिजलेल्या मृदगांधासारखा ...मी मात्र दूरवरच तुझा भास आभासत राहते ..तू माघारी फिरणार नाहीस खात्री आहे मला ..कदाचित तुजी हार असेल ती ..कदाचित मलाही ती सहन होणार नाही ..मग किनार्यावार उभ राहून पुन्हा तुजी खोली मोजण्याचा एक व्यर्थ प्रयत्न .. मला वाटत ..मी पुन्हा तुज्यात पडले तर किनारा नाही गाठू शकत ..तू आर्त आहेस..खोल ..खोल..गहीरा डोह....गवसला नाहियस पुर्ण मला ..तरीही वाटल..माझा शोध चालूच आहे .....शेवटच्या श्वासापर्यंत !!!!!!

No comments:

Post a Comment