Saturday 11 August 2012

अंतर्मुख..........

काही काही प्रसंग अंतर्मुख करून जातात ..आपल दुखः  अशावेळेस बोथट ठरत ..असाच एक प्रसंग मी आज सकाळी अनुभवला ...
डोंबिवली- सी एस टी- च्या लोकलमध्ये window सीट   मिळाली तरी पावसामुळे खिडकी उघडू शकत न्हवते म्हणून अधिकच उदास वाटत होत , तितक्यात दिव्याला एक छोटी मुलगी आणि तिची आई चढली , माज्या समोरच्या सीट वर जागा होती म्हणून त्या तिथेच बसल्या , चार साडेचार वर्षाची ती चिमुरडी भलतीच गोड होती , तिने मला पटकन म्हटलं , "तू मला window  सीट देशील , पाऊस बघायचं मला " तिच्या या भिडस्त पनाच कौतुक वाटल मला , तिच्या बोलण्यातून तिची चुणूक जाणवली मला , खूप सारे बालप्रश्न ती तिच्या आईला विचारत होती आणि तिची आईही न थकता उत्तरे देत होती. थोड्या वेळाने बाईसाहेबांची गाडी माज्याकडे वळली.. आणि मग माझ नाव , माझा  mobile  , त्यातली गाणी ,screensaver  बरंच काही विचारून झाल , एकदा वाटल बस आत्ता तुजे प्रश्न ..पण त्यातही गम्मत वाटत होती मला ,एव्हाना तिच्या आईला झोप लागली , ते पाहून ती हळूच म्हणाली , "अग खिडकी उघड ना.. पाऊस बघूया आपण..खूप मज्जा येते पावसात भिजायला ! पण आई मला भिजुच देत नाही "  .जेव्हा मी खिडकी उघडली तेव्हा तिच्या डोळ्यातली चमक एक मस्त  फिलिंग देऊन गेली मला, तिची ती smile  आत्ताही लक्षात आहे माज्या, तो निरागसपणा  आत्ताही जाणवतोय मला . तीच स्टेशन आलं, आणि तिच्या आईने तिला हात दिला, ती उभी तर राहिली , पण..पण  चालू नाही शकली , ती दोन्ही पायाने अपंग होती ...मी पाहताच राहिले, तिची आई माज्याकडे बघून कसनुस हसली, thanks  म्हणाली मला window  सीट बद्दल ..मी मात्र नाही हसू शकले, ती चिमुकली छानसा टाटा करून गेली मला ..मी मात्र तिच्या डोळ्यात पाहूच शकले नाही ..माजेच डोळे पाण्याने भरले होते ....ईश्वर करो आणि तिला पुन्हा स्वतःच्या पायाने पावसात भिजता येवो ...आत्ता window  ला बसताना आणि पाऊस बघताना त्या चिमुरडीचं निरागस हास्य मात्र नेहमी आठवेल ...

asmi
11.08.12
7.40 a.m.

No comments:

Post a Comment