Saturday, 11 August 2012

तिच्या आठवांशिवाय !!!!

कधी कधी असे हि घडते ..जी व्यक्ती जवळ असते तेव्हा तिच्याशी काय बोलायचे हा प्रश्न पडतो आणि तीच व्यक्ती दूर गेल्यावर तिच्याशिवाय काय  बोलायचे हा प्रश्न पडतो ..ती जवळ असताना तिला द्यायला पुरेसा वेळच नसतो आणि तिची जागा रिकामी जाल्यावर फावला वेळ खायला उठतो ...ती असते तेव्हा तिचा फोन कामाच्या व्यापात  नाही उचलता येत किंबहुना नंतर बोलू म्हणून तो तसाच वाजत राहतो ..आणि जेव्हा ती कायमची दूर जाते तेव्हा कधीतरी तिचा फोन येईल म्हणून तासंतास त्या फोन कडे   डोळे लागून राहतात ....ती असते तेव्हा उगाच झोपही  लवकर येते आणि नसते तेव्हा रात्र रात्र जागीच राहते ...तिला आयुष्याचा भाग म्हणून गृहीत धरलं जात ..तीच मन दुखावलं जातंय असा पुसटसा विचारही मनात येत नाही ..अशाच समज गैरसमजातून  तीच व्यक्ती दूर झाल्यावर मात्र आपण एकाकी उरलोय याची जाणीव प्रत्येक क्षणाला होत राहते ..आणि तेव्हा हातात काहीच उरलेलं नसत ..तिच्या आठवांशिवाय !!!! 
asmi 

1.08.2012

एकदा ..

ज्याची भीती होती तेच झाल ....इतके दिवस व्यस्त पणाच वंगण घातलं, दिवस रात्र जागत्या कोरडेपणाने पहारा ठेवला ..एकही अश्रू न ढळू देता ..पण कालच्या कातर वेळेने घात  केला ..जरा कुठे डोळा लागला आणि खिळ खिळ्या  झालेल्या मनाच्या कवाडातल्या आठवणी ते दार लोटून मन भर सांडल्या ..मी क्षणभर थिजले , गोंधळले , पायातलं त्राणच निघून गेल माज्या ..तिथेच बसले मी हताश होऊन त्या आठवांकडे पाहत ..आत्ता पुन्हा या वेचण  अशक्यच होत रे .."तुज्या आठवणी " तुज्या पहिल्या भेटीपासून ते शेवटच्या निरोपा पर्यंतच्या  आठवणी " .! 
.डोळ्यातल्या अश्रुनी सार काही धूसर झाल ...किती वेळ सरून गेला कळल नाही ..कातरवेळ सरून मिट्ट काळोख झाला होता ...तुज्या शेवटच्या आठवणीने मात्र दटावल मला .."उठ आत्ता"..पुरे झाल हे दुख कुरवाळण ..माजा नाईलाज झाला ..पुन्हा या सार्या आठवणी गोळा करून तशाच भरून ठेवल्या मनाच्या कोपर्यात..कवाड घट्ट लावून घेतलं पुन्हा एकदा ..
asmi ..

एक सितारा

आज पूर्ण दिवस अस्वस्थेतच जात होता ..मन अंधारून आला होत , काहीच सुचेनास झाल तेव्हा gallerit सहजच उभी राहिले  आणि नजर आकाशाकडे गेली . आज कित्येक दिवसांनी आकाश निरभ्र वाटल कि माज लक्ष खूप दिवसांनी गेल , असो कदाचित .ताऱ्यांनी लगडलेल आकाश खूप सुंदर दिसत होत ,माजी नझर फिरता फिरता अचानक एका ताऱ्यावर  पडली , मी थांबले , अडखळले ,खूप वेगळा वाटला मला तो , इतर तार्यान्सारखाच  पण असामान्य .त्याची चमकच वेगळी होती ,आकर्षित तरीही त्याला कुठला आव न्हवता ,सामान्यातलं असमान्यापन होत त्याच्या चमकेत, इतर सुंदर , बेगडी तार्याहूनही    हा वेगळा भासला मला , त्याच्या भवतालच वलयही लोभस होत , तीव्र आत्मविश्वास जाणवला त्याच्या चमकेत . मी प्रेमातच पडले त्याच्या पहिल्याच नजरेत , अन मग मला वेडच लागल त्याच . कधी एकदा सांजवेळ होते याचीच वाट पाहायचे मी , तो तर कितीही तार्यांच्या गर्दीत मला दिसायचा , जणू तोही माज्यासाठीच थांबायचा , तासंतास त्याच्याकडे पाहूनही मन नाही भरायचं माज ,कित्येकदा तर तो माज्याकडे बघून हसतोय असा हि भास व्हायचा मला , दिवसेंदिवस माझ हे  वेड वाडतच चाललं होत ,, आणि एके दिवशी अशीच त्याची वाट बघत थांबले होते ,आज का कोण जाणे तो मला हुलकावणी देत होता , जणू माज्या प्रेमाची परीक्षाच बघत होता , मी त्याला सैरभैर नजरेने शोधत होते , डोळे अश्रुनी पाणावले  आणि मी त्याला गमावून बसले या नुसत्या विचारानेही एक थंड शहारा उठला , पायातल त्राणच निघून गेल जणू , मी वळणार माघारी तितक्यातच तो दिसला , एक मोठ्या ढगा अडून   जणू माजी अवस्था पाहात होता ..पण कशी सांगणार होते त्याला कि तुज्या या लपंडावाने जीवच गेला असता माजा , मी रागावू मात्र नाही शकले त्याच्यावर , पण आज तो मला उदास वाटला , जणू तो काही सांगू पाहतोय असा वाटल , पण काय नेमक कळत न्हवत , त्याची चमक कमी होत होती , प्रेयसी पासून दूर जाताना प्रियकराची जशी अवस्था असते तशीच काहीशी त्याची ...क्षणभर वाटल त्याने याव मज जवळ , माज्या कुशीत विसावं ..माज भवताल व्यापून टाकावं आणि तो वेगाने माज्याकडे येवू लागला आणि बघता बघता नजरेतून निसटला ..गर्दीत हरवून गेला ..
खूप उशीर झाला होता माज्या भावना त्याच्यापर्यंत पोहचायला ...माजा लाडका तारा निखळला होता ...
आजही आकाशाकडे पाहताना  नजर वळतेच , आजही तो दिसेल अशी वेडी आशा वाटत राहते ,त्यानंताच्या साऱ्याच रात्री सुन्या गेल्या ..त्याची आठवण आली नाही असा एकही क्षण गेला नाही . त्याच ते असामान्यत्व मला आजही व्यापून टाकत , सवइचा  भाग होता तो माज्या आणि तसाच बनून राहिलाय ,
आजही वाटत तो येईल , मला दिसेल , ओळखीच पाहून हसेल , माज तनमन व्यापून टाकेल.. मी वाट पाहतेय ...
आकाशीचा रंगही गहिरा ..त्यात निखळला एक सितारा ...मागितले अस्तित्व तुजे  अन पुसले माजे नाव ..
अस्मी
१०.०८.१२

अंतर्मुख..........

काही काही प्रसंग अंतर्मुख करून जातात ..आपल दुखः  अशावेळेस बोथट ठरत ..असाच एक प्रसंग मी आज सकाळी अनुभवला ...
डोंबिवली- सी एस टी- च्या लोकलमध्ये window सीट   मिळाली तरी पावसामुळे खिडकी उघडू शकत न्हवते म्हणून अधिकच उदास वाटत होत , तितक्यात दिव्याला एक छोटी मुलगी आणि तिची आई चढली , माज्या समोरच्या सीट वर जागा होती म्हणून त्या तिथेच बसल्या , चार साडेचार वर्षाची ती चिमुरडी भलतीच गोड होती , तिने मला पटकन म्हटलं , "तू मला window  सीट देशील , पाऊस बघायचं मला " तिच्या या भिडस्त पनाच कौतुक वाटल मला , तिच्या बोलण्यातून तिची चुणूक जाणवली मला , खूप सारे बालप्रश्न ती तिच्या आईला विचारत होती आणि तिची आईही न थकता उत्तरे देत होती. थोड्या वेळाने बाईसाहेबांची गाडी माज्याकडे वळली.. आणि मग माझ नाव , माझा  mobile  , त्यातली गाणी ,screensaver  बरंच काही विचारून झाल , एकदा वाटल बस आत्ता तुजे प्रश्न ..पण त्यातही गम्मत वाटत होती मला ,एव्हाना तिच्या आईला झोप लागली , ते पाहून ती हळूच म्हणाली , "अग खिडकी उघड ना.. पाऊस बघूया आपण..खूप मज्जा येते पावसात भिजायला ! पण आई मला भिजुच देत नाही "  .जेव्हा मी खिडकी उघडली तेव्हा तिच्या डोळ्यातली चमक एक मस्त  फिलिंग देऊन गेली मला, तिची ती smile  आत्ताही लक्षात आहे माज्या, तो निरागसपणा  आत्ताही जाणवतोय मला . तीच स्टेशन आलं, आणि तिच्या आईने तिला हात दिला, ती उभी तर राहिली , पण..पण  चालू नाही शकली , ती दोन्ही पायाने अपंग होती ...मी पाहताच राहिले, तिची आई माज्याकडे बघून कसनुस हसली, thanks  म्हणाली मला window  सीट बद्दल ..मी मात्र नाही हसू शकले, ती चिमुकली छानसा टाटा करून गेली मला ..मी मात्र तिच्या डोळ्यात पाहूच शकले नाही ..माजेच डोळे पाण्याने भरले होते ....ईश्वर करो आणि तिला पुन्हा स्वतःच्या पायाने पावसात भिजता येवो ...आत्ता window  ला बसताना आणि पाऊस बघताना त्या चिमुरडीचं निरागस हास्य मात्र नेहमी आठवेल ...

asmi
11.08.12
7.40 a.m.