Wednesday, 30 May 2012





काळोखाच्या पहाडा समोर  तू माज्या प्राक्तनाची पणती  ठेवलीस  आणि म्हणालीस , " जा ..निशंक  मनाने  जा ..आकाश तुजे आहे आणि मीही तुजीच आहे "  एरव्ही असतो आपण , भविष्याची भिंत चाचपडत अंधारात ..सरपटनाऱ्या  शंकेवरती  आपला पडत राहतो पाय ..वारंवार ..डंख होतो ..कापर होत मन . ..." पण सांग ..अस्तित्वाच्या दगडावर विश्वासाची चिन्नी होऊन तू माज्यासाठी थांबशील का ?????? 
***

Wednesday, 9 May 2012

काही नाती मुळातच किती हळुवार , नाजूक असतात ..ध्यानी मनी नसताना अनेक  ओळखीच्या चेहर्यापैकी अचानक एक चेहरा खूप जवळचा वाटायला लागतो , वर्षानुवर्षे ओळख असल्यासारखा ...त्या व्यक्तीचा आवाज खूप जवळचा वाटायला लागतो , त्याच्यावरच्या विश्वसाच पारड जड होत जात ..कित्येक गोष्टी share करण्यासाठी ती व्यक्ती safe वाटू लागते ...कळत नकळत एक बंध जुळू लागतो ..आणि गम्मत म्हणजे हि व्यक्ती अगदी समोर नसतानाही हे नात निर्माण होत ..विश्वास नाही बसत ..पण हे सत्य आहे..phone freind , chat frend हा त्यातलाच प्रकार आहे ...न बघता  ..न भेटता ती व्यक्ती आपल्यासाठी सवईचा एक भाग होऊन जाते..हेच नात कधी मैत्रीत बदलत ..तर कधी प्रेमात ..आणि हेच नात कधी मैत्रीच्या पलीकडे पण प्रेमाच्या अलीकडल होऊन राहत ..नात्यांचा गूढपणा, त्यातली गुंतागुंत सारच मजेशीर ..कधी व्यक्त होऊन अव्यक्त राहिलेलं तर कधी अव्यक्त राहून खूप काही बोलून , देऊन गेलेलं ....

Monday, 7 May 2012

तू धाडावा सांगावा कधी , 
शुभ्र  घनांवर काळ्या शाईने ,
बरसावे ते शब्द होऊनी..
 चिंब भिजल्या सरीने ,
नभ नाचावे फेर धरुनी  अन ताल धरावा विजेने,
स्पर्श होता या मल्हाराचा , तुला स्मरावे मिठीने ...
अस्मी ....